पुणे : मुसळधार पावसाने काल (14 ऑक्टोबर) पुण्याची दैना उडवली. रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोंढे, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शिरलेले पाणी, सखल भागांतील घरांमध्ये शिरलेले पाणी अशात पुणेकरांना कालची रात्र काढावी लागली. आज, सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी, पावसाच्या पाण्यातून आलेल्या मातीमुळं साचलेला चिखल, घरांमध्ये साचलेलं पाणी अशा परिस्थिती पुणेकरांची सकाळ झाली आहे.
आणखी बातम्या
मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; वाचा काल रात्री काय घडलं?
व्हिडिओ:दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहिले पाण्याचे लोंढे
पुण्यात पावसाचे थैमान, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
महापालिकेची हेल्पलाईन
- महापालिका आपत्ती व्यवस्थापन
- ०२०२५५०६८००
- ०२०२५५०६८०१
- ०२०२५५०६८०२
- ०२०२५५०६८०३
- ०२०२५५०६८०४
- पोलिस : १००
- अग्निशमन : १०१
- रुग्णवाहिका : १०८
परीक्षा पुढे ढकलल्या
विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं काल पुणे शहरात धुमाकूळ घातला. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. आज सकाळपासून पावसाची उघडीप आहे. परंतु, घरात शिरलेले पाणी आणि त्या पाण्यासोबत आलेला चिखल काढण्यात अनेकांची सकाळ खर्ची पडली आहे. पाणी शिरलेल्या वस्त्त्यांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पावसामुळे ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
Maharashtra: Savitribai Phule Pune University has postponed the online and offline examinations scheduled for today, due to heavy rainfall alert. Revised schedule to be announced later.
— ANI (@ANI) October 15, 2020
from News Story Feeds https://ift.tt/3lNcvx7
via IFTTT
No comments:
Post a Comment