रशियाचा विचित्र निर्णय; पहिली लस नाकारल्यानंतरही, दुसऱ्या लसीला मान्यता - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

रशियाचा विचित्र निर्णय; पहिली लस नाकारल्यानंतरही, दुसऱ्या लसीला मान्यता

https://ift.tt/eA8V8J

मास्को : जगातील सर्वांत पहिली लस बनवल्याचा दावा रशियाने केला होता. आपली स्फुटनिक-व्ही ही लस प्रभावी असून आपण त्याला मंजूरी देत असल्याचे रशियाने जाहिर केले होते. मात्र, या लशीच्या योग्य त्या चाचण्या करायच्या आधीच या लशीला दिलेल्या मंजूरीमुळे संशोधकांनी या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्वचिन्ह उठवले आहे. घाईगडबडीत याप्रकारे लस मंजूर करुन ती बाजारात  आणणे, धोक्याचे असल्याचा ईशारा अनेकांनी दिला आहे. अशातच आता रशियाने आपली दुसरी लस निर्माण केली आहे. 

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी रात्री याबाबत घोषणा केली. या घोषनेनुसार रशियाने दुसऱ्या कोरोना व्हायरस लशीला सुरवातीच्या टप्प्यातील चाचणीच्या यशस्वीतेनंतर मंजूरी दिली आहे. EpiVacCorona असं या लशीचे नाव असून या लशीला सायबेरियन बायोटेक कंपनीने विकसित केलं आहे. पेप्टाईडवर आधारीत ही लस कोरोनापासून वाचण्यासाठी दोनवेळा द्यावी लागेल. या लशीची निर्मिती सायबेरियाधील व्हेक्टर इन्स्टिट्यूटने केली आहे. 

हेही वाचा - हे वर्ष संपायच्या आतच अमेरिकेकडे असेल लस; निवडणुक प्रचारात ट्रम्प यांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यापासून या लशीच्या सुरवातीच्या टप्प्यातील अभ्यासानंतर या लशीला आता मान्यता दिली गेली आहे. पुतीन यांनी बुधवारी टिव्हीवर केलेल्या वक्तव्यात म्हटलं की, देशातील व्हायरॉलॉजी एँड बायोटेक्नोलॉजी सेंटर नोवोसिबिरस्क व्हेक्टरने आज दुसऱ्या कोरोना व्हायरसवरील लशीची नोंद केली आहे. राष्ट्रपती पुतिन यांनी म्हटलंय की या लशीची 100 लोकांवर केली गेलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. 

उपपंतप्रधान ततयाना गोलिकोवा यांनाही लस दिली गेली
मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रशियाचे उपपंतप्रधान ततयाना गोलिकोवा आणि रशियाच्या संरक्षण संस्थेचे प्रमुख अन्ना पोपोवा यांनाही लस दिली गेली आहे. या लशीची दोन महिने चाचणी सुरु आहे आणि संशोधकांनी अद्याप त्याचे निष्कर्ष जाहीर केले नाहीयेत.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"

डिसेंबरपर्यंत तिसऱ्या लशीलाही सरकारी मंजूरी
गोलिकोवा यांनी सांगितलं की डिसेंबरपर्यंत रशियाची तिसऱ्या कोरोना व्हायरस लशीला सरकारी मंजूरी मिळेल. त्यांनी म्हटलं की व्हेक्टरची योजना अशी आहे की, EpiVacCorona लशीचे पहिले साठ हजार डोस लवकरात लवकर तयार केले जातील. याआधी रशियाने अशी घोषणा केली होती की त्यांनी जगातील सर्वांत पहिली करोनावरील लस Sputnik V ला मंजूरी दिली आहे. 

भारताने नाकारली मोठ्या प्रमाणावरील चाचणी

दरम्यानच, भारताने रशियाच्या Sputnik V या लशीच्या मोठ्या प्रमाणावरील चाचणीस नकार दिला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीच्या भारतात रशियाच्या लशीच्या मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्याच्या प्रयत्नांना नकार दिला आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/3dqTcGU
via IFTTT

No comments:

Post a Comment