पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारी संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापरीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
आणखी बातम्या वाचा
मुसळधार पावसाने उडवली, पुणेकरांची झोप
पुण्यात रात्री काय घडलं? पाहा फोटो फिचर
Maharashtra: Savitribai Phule Pune University has postponed the online and offline examinations scheduled for today, due to heavy rainfall alert. Revised schedule to be announced later.
— ANI (@ANI) October 15, 2020
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी पुणे शहर, बारामती, इंदापूर यासह इतर ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. ग्रामीण भागांमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. ऑफलाइन परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात पाणी घुसले आहे. तसेच अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने व मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आज होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती आणि विद्यार्थ्यांनी केली होती अखेर पुणे विद्यापीठाने गुरुवारी पहाटे परीक्षा पुढे ढकलल्या बाबत निर्णय घेतला.
Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती
डॉक्टर महेश काकडे म्हणाले, मुसळधार पावसामुळे आज(ता.१५) होणारे अंतीम वर्षाचे सर्व पेपर #पुणे विद्यापीठाने रद्द केले. ऑफलाइन, ऑनलाईन यापैकी कोणतीही परीक्षा होणार नाही.लपरीक्षा केंद्रांमध्ये पाणी आले, डेटा सेंटर मध्ये प्रोब्लेम आला आहे. आज संध्याकाळ पर्यंत यामध्ये दुरूस्ती केली जाईल.
from News Story Feeds https://ift.tt/2GRbiX2
via IFTTT
No comments:
Post a Comment