16 वर्षांची ही मुलगी एकाच वेळी चक्क दोन्हीं हातांनी लिहिते; SPEED ही कमालीच! - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, September 15, 2020

16 वर्षांची ही मुलगी एकाच वेळी चक्क दोन्हीं हातांनी लिहिते; SPEED ही कमालीच!

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली : हस्ताक्षर सुंदर असणे ही एक कला आहे. प्रत्येक वर्गात एकुण पटाच्या मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये हा गुण असतो हे अनेकजण सहज मान्य करतील. काहींच्या अक्षर इतके सुंदर असते की त्याकडे फक्त बघतच बसावे अशीही अनुभूती येते. ब्रिटनमधील वारविक विद्यापीठातील एका सर्वेनुसार मुलांच्या तुलनेत मुलींचे हस्ताक्षर अधिक सुंदर असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. या कलेच्या पलीकडे जाऊन  एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याचे कसब एका मुलीने आत्मसात केलंय हे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे. नुकताच आपला 16 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या  आदि स्वरुपा या मंगलुरुची मुलगी लक्षवेधी ठरत आहे. 

सुप्रिया सुळे यांनी पीएम केअर फंडावरून सरकारला पकडले कोंडीत 

आदि स्वरूपा ही एकाच वेळी दोन्ही हाताने लिहू शकते. तेही झटपट आणि वळणदार शैलीत. नुकतेच तिने यासंदर्भात एएनआयला मुलाखत दिली. आपल्या कौशल्याबद्दल ती म्हणते की, इंग्लिश आणि कन्नड दोन भाषेत एकावेळी दोन्ही हाताने सहज लिहू शकते. याशिवाय गायन आणि मिमिक्रीचा छंदही जोपासते, असेही तिने सांगितले.  अथक परिश्रम आणि त्यामागचा सराव यामुळे लेकीनं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सहज आणि सोपी असल्याचे सिद्ध केल्याचे आदिच्या आईने म्हटले आहे. आदि स्वरुपा एका मिनिटात दोन्ही हातांनी एकावेळी  45 शब्द लिहू शकते, अशी माहितीही तिच्या आईने सांगितली. वयाच्या अवघ्या अडीच वर्षांपासून आदि दोन्ही हाताने लिहिते, हे सांगायलाही तिची आई विसरली नाही. 

...तर कांदा निर्यातबंदीचा फेरविचार

सध्याच्या घडीला लॅपी आणि स्मार्टफोनच्या दुनियेत वेगवेगळ्या शैलीत शब्द लिहिणे सहज सोपे झाले आहे. विशेष म्हणजे आदिकडेही  दोन्ही हातांनी दहा प्रकारच्या शैलीत अक्षराला  वळण देण्याचं कसब असल्याचे पाहायला मिळते.  याबद्दल आदि म्हणते की,  यूनिडायरेक्शनल, अपोजिट डायरेक्शन, राइट हँण्ड स्पीड, लेफ्ट हँण्ड स्पीड, रिवर्स रनिंग, मिरर इमेज, हेटेरो टॉपिक, हेटेरो लिंगुइस्टिक, एक्सचेंज, डांसिंग आणि ब्लाइंड फोल्ड अशा विविध 10 स्टाइलमध्ये दोन्ही हाताने एकाच वेळी लिहू शकते. साहित्याची आवड असणारी आदि इंग्रजी भाषेत कादंबरीही लिहित आहे.  माहितीनुसार, वयाच्या दीड वर्षापासून तिने लिहायला वाचायला सुरुवात केली. वर्षभरात तिने दररोज 30 पाने लिखान करण्याचा सराव सुरु केला. आता ती चार ते पाच सेकंदात  1,000 पेक्षा अधिक वस्तू लक्षात ठेवण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दृष्टिने तयारी करत आहे.  



from News Story Feeds https://ift.tt/35EqL6A
via IFTTT

No comments:

Post a Comment