फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट; चार आठवड्यांसाठी लॉकडाऊन - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट; चार आठवड्यांसाठी लॉकडाऊन

https://ift.tt/eA8V8J

पॅरिस: आशिया खंडातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाच आता युरोपमधील काही देशांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिससह लीली, लिऑन, मार्सेली, टुलूसी या शहरांत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे.   

स्पुटनिकच्या मते, फान्समधील हा कर्फ्यू चार आठवड्यांसाठी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत (21 तास) असणार आहे. हा कर्फ्यू शनिवारपासून सुरु होत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन घरी रहावे, अशी माहितीही अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली आहे. 

देशातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी 4 आठवड्यांसाठी लागू केलेला कर्फ्यू पुरेसा असणार आहे, अशी माहिती फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्थानिक मिडीयाला दिली आहे. तसेच पुढे बोलताना मॅक्रॅान यांनी सांगितले की, हा कर्फ्यू इली-डी-फ्रान्स, लीली, ग्रेनोबेल, लायन, मार्सेली, रोवीन, सेंट इटीनी, माँटपिलियर आणि टुलूसी भागांत असणार आहे. 

फ्रान्समध्ये आतापर्यंत 7 लाख 56 हजार 472 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील 24 तासांत फ्रान्समध्ये कोरोनाचे 22 हजार 551 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 32 हजार 942 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(edited by- pramod sarawale) 



from News Story Feeds https://ift.tt/3kdOwHj
via IFTTT

No comments:

Post a Comment