Mumbai Rain Updates: मुंबई, ठाण्यासह रेड अलर्ट, पुढचे २४ तास सतर्क राहा - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

Mumbai Rain Updates: मुंबई, ठाण्यासह रेड अलर्ट, पुढचे २४ तास सतर्क राहा

https://ift.tt/eA8V8J

मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली होती. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री ११ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला.

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु होता. या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. सायन येथील किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणाता पाणी साचलं होतं. मुसळधार पावसानंतर मुंबईच्या हिंदमाता, सायन, परळ, चेंबूरसह अनेक सखल भाग पूरस्थिती निर्माण झाली. 

मुंबई आणि आजूबाजूच्या भागात पुढील 24 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. त्यामुळे मुंबईकरांना आणि प्रशासनाला हवामान विभागानं अलर्ट दिला आहे. गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं.

वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे. मुंबईत १४ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते १५ ऑक्टोबर पहाटे २.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने ८३ मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे.  तर सांताक्रूझ वेधशाळेत ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

Rain continues Mumbai IMD issued red alert in Mumbai for today



from News Story Feeds https://ift.tt/2IwM4O1
via IFTTT

No comments:

Post a Comment