ट्रम्प यांना धक्का; भारतीय-अमेरिकन लोकांचे बायडेन यांनाच समर्थन - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

ट्रम्प यांना धक्का; भारतीय-अमेरिकन लोकांचे बायडेन यांनाच समर्थन

https://ift.tt/eA8V8J

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय अमेरिकन एटिट्यूड सर्व्हे म्हणजेच आयएएएसच्या म्हणण्यानुसार, एकूण भारतीयांपैकी मतदानासाठी पात्र असलेले 70 टक्क्यांहून अधिक भारतीय अमेरिकन मतदार जो बायडेन यांना मत देण्याच्या विचारात आहेत. आणि उर्वरित 22 टक्के डोनाल्ड ट्रम्प यांना मत देतील. 

सप्टेंबर महिन्याच्या आधी 20 दिवसांत 936 भारतीय-अमेरिकन लोकांच्या उत्तरांवर आधारित हा डेटा समोर आला आहे. ऑनलाईन पद्धतीने केलेला हा सर्व्हे सांगतो की, 56 टक्के लोकांनी सांगितलंय की ते स्वत: ला डेमोक्रॅटीक मानतात तर केवळ 15 टक्के लोक स्वत:ला रिपब्लिकन मानतात. 
या सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, भारतीय-अमेरिकन लोक आपल्या मतदानाचा निर्णय करताना अमेरिका-भारत यांच्यातील संबंधांना फार महत्वाचे मानत नाहीत. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आपले संबंध दृढ करण्यास आणि भारताकडून आपल्याला मोठं समर्थन आहे, असा दावा केला असला तरीही ते डेमोक्रॅटीक पक्षाला समर्थन करणं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात काही करतोय, अशी भावनाही बाळगत नाहीत. सर्व्हेनुसार, बहुतांश भारतीय- अमेरिकन लोक असं मानतात की डेमोक्रॅटीक पक्ष कोणत्याही बाबतीत अमेरिका आणि भारतीय संबंधाबाबत अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"

या दरम्यानच ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या जो बायडेन यांनी उप-राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सीनेटर कमला हॅरिस यांची निवड केलीय. कमला हॅरिस या भारतीय-अफ्रिकन वंशाच्या अमेरिकन आहेत. त्यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेतील भारतीय समुदायाला डेमोक्रॅटीक पक्षाकडे खेचण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका निभावली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, ऑगस्ट महिन्यातच कमला हॅरिसने आपली आई श्यामला गोपालन यांच्याबाबत आणि इडली-मसाला डोशाच्या त्यांच्या आवडीचा उल्लेख केल्याची चर्चा आणि बातमी भारतात झाली होती. 

हेही वाचा - हे वर्ष संपायच्या आतच अमेरिकेकडे असेल लस; निवडणुक प्रचारात ट्रम्प यांचा दावा

भलेही भारतीय लोकांमधील नोंदणीकृत मतदारांच्या एक टक्क्याहून कमी प्रतिनिधित्व अमेरिकेत असले तरीही भारतीय-अमेरिकन लोकांची मते दखलपात्र आहेत. रिपोर्टनुसार, 2016 मध्ये डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांना भारतीय-अमेरिकन नागरिकांची तब्बल 91 टक्के मते मिळाली होती. आता याच लोकांचे जो बायडेन यांना समर्थन असल्याचे हा रिपोर्ट सांगतो. 

हेही वाचा - रशियाचा विचित्र निर्णय; पहिली लस नाकारल्यानंतरही, दुसऱ्या लसीला मान्यता

या सर्व्हेचे निष्कर्ष रंजक आहेत. सर्वधर्मीय भारतीय-अमेरिकन लोकांचे ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन यांनाच समर्थन आहे. 67 टक्के हिंदूच्या तुलनेत 82 टक्के मुस्लिमांचे बायडेन यांना तगडे समर्थन आहे. यादरम्यानच, बहुतांस ख्रिश्चन समुदाय ट्रम्प यांनाच समर्थन देतो आहे. जवळपास 45 टक्के ख्रिश्चन राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांना पसंती दर्शवतात. 



from News Story Feeds https://ift.tt/3k0WhjC
via IFTTT

No comments:

Post a Comment