रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री उशिरा झाली हार्ट सर्जरी - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, October 3, 2020

रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री उशिरा झाली हार्ट सर्जरी

https://ift.tt/eA8V8J

पटना: केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या रामविलास पासवान यांची अचानक तब्येत खालावल्याने शनिवारी दिल्लीत त्यांची हार्ट सर्जरी केली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान यांच्यावर रुग्नालयात उपचार सुरु होते. काल एकदम त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने चिराग पासवान (Chirag Paswan) संसदीय बैठक सोडून गेले होते. 

शनिवारी रात्री उशिरा रामविलास पासवान यांचं ऑपरेशन केलं गेलं. याबद्दलची माहिती चिराग पासवान यांनी रविवारी सकाळी ट्विट करुन दिली. यामध्ये चिरागने लिहले आहे की, "मागील काही दिवसांपासून बाबांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने रात्री उशिरा ऑपरेशन करावं लागलं. गरज पडली तर काही आठवड्यांनी अजून एक ऑपरेशन करावं लागण्याची शक्यता आहे. संकटाच्यावेळी आपण सर्वजण माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार."

वाचा सविस्तर- सावधान! मोदी सरकार मुलींच्या खात्यात 2 लाख रुपये पाठवत असल्याची पोस्ट होतेय व्हायरल

 ही दिवसानंतर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. याकाळात रामविलास पासवान यांची तब्येत बिघडल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण रामविलास पासवान हे जनशक्ती पार्टीचे प्रमुख नेते आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. दुसऱ्याबाजूला एनडीएमध्ये जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/2Gzld2K
via IFTTT

No comments:

Post a Comment