सावधान! मोदी सरकार मुलींच्या खात्यात 2 लाख रुपये पाठवत असल्याची पोस्ट होतेय व्हायरल - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, October 3, 2020

सावधान! मोदी सरकार मुलींच्या खात्यात 2 लाख रुपये पाठवत असल्याची पोस्ट होतेय व्हायरल

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली: मागील काही वर्षापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जातंय की, केंद्र सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत एक फॉर्मचे वाटप करत आहे. या योजनेअंतर्गत सर्व मुलींना दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. पीआयबी फॅक्टचेकने ( PIBFactCheck) या दाव्याची चौकशी केली असता तो बनावट असल्याचं आढळलं आहे. पीआयबीने याबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, अशा प्रकारच्या फॉर्मचे वितरण बेकायदेशीर असून या योजनेंतर्गत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही.

फेक न्यूजचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र सरकारसंबंधी आणखी एक बनावट बातमी व्हायरल होत आहे. या बातमीत असा दावा केला जात आहे की, बीपीएल श्रेणीतील प्रत्येक कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. ही मदत 'पंतप्रधान कन्या अनुदान' योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसून नागरिकांनी त्यांची वैयक्तिक माहिती देणे टाळावे.

वाचा सविस्तर- भारतीय स्वदेशी बनावटीची दोन वेगवान रेल्वे इंजिने सज्ज; चाचण्या यशस्वी

 ऐवढ्यावरचं न थांबत आणखी एक मोठी बनावट बातमी समोर आली होती. ज्यामध्ये केंद्र सरकार 'पंतप्रधान कन्या आयुष' योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 2 हजारांची रुपयांची रक्कम देत आहे.  याबद्दल पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे की, केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही ज्यात मुलींना 2 हजार रुपये दिले जात आहेत. सरकार या अशा बनावट बातम्यांबद्दल नेहमी नागरिकांना सावध करत आलं आहे. यामध्येही सरकारने अधिकृत ट्वीटर हँडलवरून लोकांना अशा बनावट योजनांनापासून दुर राहण्याचा सल्ला दिला आहे.

जर तुम्हालाही अशी बातमी अथवा संदेश आला तर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. एखाद्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरण्यास सांगितले गेल्यास ते टाळा. तुमची कोणतीही माहिती देऊ नका. कोणत्याही प्रकारची फी किंवा पैशांची मागणी केल्यास त्यापासून दुर रहा. विनाकारण फसवणूकीचा बळी होऊ नका.

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ

तक्रार कशी करावी- एखादी फेक न्यूज तुम्हाला आढळल्यास तुम्ही त्याबद्दलचे  स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल या pibfactcheck@gmail.com मेल आयडीवर पाठवू शकता.



from News Story Feeds https://ift.tt/34nOvcN
via IFTTT

No comments:

Post a Comment