वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. प्रेसिंडेन्शियल डिबेट्सनाही सुरवात झाली असून एक डिबेट नुकतीच पार पडली आहे. मात्र प्रचार टिपेला पोहोचला असताना विद्यमान राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या विषाणूने संक्रमित झाले आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत सविस्तर माहिती देणारे हेल्थ बुलेटिन काल जाहिर करण्यात आले. या बुलेटिननुसार येणारे 48 तास त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहेत. त्यांना ताप नाहीये. मात्र, या जाहिर केलेल्या बुलेटिनमध्ये त्यांच्या तब्येतीसंदर्भात काही विशेष बाबी जाहिर केलेल्या नाहीयेत. न्यूयॉर्क टाइम्सने ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांच्या हवाल्याने असं वृत्त दिलं आहे की, राष्ट्राध्यक्षांची अवस्था फारच चिंताजनक आहे.
24 तासात तब्येतीत सुधारणा
ट्रम्प यांच्यावर उपचार करणाऱ्या मेडिकल टिमने म्हटलंय की, त्यांना श्वास घेण्यासंबधी कसलीही समस्या नाहीये. त्यांना ऑक्सिजन देण्याचीही काही गरज नाहीये. या टिमने म्हटलंय की ट्रम्प ठिक आहेत मात्र पुढचे 48 तास त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहेत. या टिममधील डॉक्टर सीन कॉल्ने यांनी म्हटलंय की ट्रम्प आपल्या अंथरुणातून उठून थोडं चालले देखील. त्यांना या 24 तासादरम्यान ताप, कफ, बंद नाक आणि कणकण यासारखी कोणतीही लक्षणे नव्हती.
हेही वाचा - क्रिकेटपटूला कारची जोरात धडक; गंभीर जखमी झाल्याने कोमात
व्हाईट हाऊसमध्ये क्वारंटाईन आहेत मेलानिया
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानियादेखील कोरोना व्हायरसमुळे संक्रमित आहेत. ट्रम्प यांचा उपचार वाल्टर रीड आर्मी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. तर मेलानिया व्हाईट हाऊसमध्येच सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. ट्रम्प कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं शुक्रवारी समजलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ देखील ट्विट केला होता, ज्यात त्यांनी आपल्यासोबत आपली पत्नीदेखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कळवलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की त्यांची आणि त्यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. व्हाईट हाऊसने सुचना देताना म्हटलं होतं की त्यांना थोडी थकल्यासारखं वाटतंय मात्र ते आशावादी आहेत.
हेही वाचा - मास्कमुळे घातक वायू तयार होत नाही; संशोधकांचे स्पष्टीकरण
व्हाईट हाऊसकडून जाहिर केलेल्या सुचनेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीर हे औषध दिलं जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर कसलेही उपचार नाहीयेत. मात्र, या व्हायरसला कमकुवत करण्यासाठी म्हणून ज्या औषधाच्या वापराची चर्चा आहे त्यातील एक रेमडेसिवीर हे आहे.
from News Story Feeds https://ift.tt/3cXTkxw
via IFTTT


No comments:
Post a Comment