खरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका; भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो
अकोला: नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्र मात्र विधेयकांविरोधात बऱ्यापैकी शांत आहे. मात्र, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच याविषयात आव्हान दिलं आहे.
मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वी आणलेल्या तीन कृषी कायद्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. काँग्रेसकडूनही केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांवर टीका केली जात असतानाच “मोदीजी आपली ५६ इंचची छाती असेल, तर शेतकऱ्यांसाठी दोन ओळी कृषी विधयेकात टाका,” असं आव्हान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
नरेंद्र मोदींनी निवडणूकीच्या वेळी शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. 50 टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानूसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कृषी कायद्यांना देशभरात विरोध होत असताना राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना कृषी कायद्यांवर भूमिका मांडली. “कृषी कायद्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका भाजपासोबत असतानाही याच पद्धतीनं होती. जिथं खरं होतं तिथं उभी राहिली. आमचं असं मत आहे की, बिलामध्ये दुरूस्ती करायला हवी. बिल जसंच्या तसं स्वीकारायला आम्ही तयार आहोत.
मोदीजींची जर ५६ इंचची छाती असेल, तर ५६ इंच छाती स्वीकारतो. फक्त दोन ओळी त्यात टाका की, ५० टक्के नफा धरून भाव काढू आणि ५० टक्के नफा धरून जो भाव निघेल तशी खरेदी करू. इतक्या दोन ओळी टाका. गरज पडल्यास आम्ही भाजपात प्रवेश करू,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या आक्रमक वक्तव्यांवरून वारंवार चर्चेत असणारे राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपूर्वी सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर कृषी विभाग झोपल्याची टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता. पेरणी केल्यानंतर सोयाबीन उगवले नव्हते यावरुन कडू यांनी महाबीजवर देखील आरोप केले होते.
from News Story Feeds https://ift.tt/2Sr6zNL
via IFTTT


No comments:
Post a Comment