पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, October 4, 2020

पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

https://ift.tt/eA8V8J

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून रविवारी सायंकाळी हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना टीटीगढ येथे घडली आहे. भाजपाच्या जिल्हा समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची काही अज्ञातांनी टीटागढ येथे रविवारी गोळ्या घालून हत्या केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याबद्दल राज्यपालांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस महासंचालकांना समन्स पाठवलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये अज्ञातांनी भाजपाच्या 24 उत्तर परगना जिल्हा समितीचे सदस्य मनिष शुक्ला यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना टीटीगढमध्ये रविवारी सांयंकाळी घडली. मनिष शुक्ला हे पक्ष कार्यालयात जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच घडली आहे. याबद्दलची गंभीर दखल घेत राज्यपाल जयदीप धंकर यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे.

Corona Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 66 लाखांच्या वर; 24 तासांत 74 हजार 442 नवीन रुग्ण

या घटनेवरून भाजपाने तृणमूल काँग्रेसवर निशाना साधला आहे. तृणमूल काँग्रेसचा हा 'राजकीय दहशतवाद' आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे.“भाजपाचे युवा नेते मनिष शुक्ला यांची हत्या निंदनीय आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेखाली असलेल्या पश्चिम बंगालमधील रक्तरंजित राजकारणाचं हे एक मोठं उदाहरण आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते का? तृणमूलचा राजकीय दहशतवाद,” अशी टीका प्रदेशाध्यक्ष घोष यांनी केली आहे.

हे वाचा - ट्र्म्पना दिलं जातंय 'स्पेशल औषध'; अजुन इतरांसाठी नाही उपलब्ध

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्यपाल जयदीप धंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याचे गृह सचिव, अतिरिक्त गृहसचिव कृष्णा द्विवेदी व पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक विरेंद्र यांना आज उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



from News Story Feeds https://ift.tt/3cYYnxz
via IFTTT

No comments:

Post a Comment