गल्लीत कुत्र मेलं, मृत्यूची शंका आली म्हणून थेट केंद्र सरकारला मेल अन् चौकशीसाठी तीन उपायुक्तांची नेमणूक - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, October 4, 2020

गल्लीत कुत्र मेलं, मृत्यूची शंका आली म्हणून थेट केंद्र सरकारला मेल अन् चौकशीसाठी तीन उपायुक्तांची नेमणूक

https://ift.tt/eA8V8J

कोल्हापूर : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. रोज किमान 10 ते 20 व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होतात. शासकीय रूग्णालयात रेबीस लस टोचून घेत वेदणा सोसतात. अशा स्थितीत राजेंद्रनगर परिसरात एक मोकाट कुत्र्याचा मृत्यू झाला. त्या मोकाट कुत्र्यांच्या मृत्यूची शंका व्यक्त झाली. त्याची तक्रार ई मेलव्दारे दिल्लीत केंद्रीय मंत्रालयाकडे गेली. चक्रे फिरली, शहरातील उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांकडून मोकाट कुत्रा मृत्यूच्या घटनेची चौकशी सुरू झाली. स्थानीक यंत्रणेला हवालदिलं होण्याची वेळ आली. 

शहरातील अनेक भागात किमान 5 ते 20 कुत्र्यांच्या टोळ्या आहेत. दिवसा विश्रांती घेतात, रात्रीच्या अंधारात कर्कश्य आवाजात रडतात, गल्लीचा भितीने थरकाप उडवतात. रात्री अपरात्री कोणी मोटर सायकलने किंवा चालत निघाला की, एका वेळी चार पाच कुत्री अचानक भुंकत येत धडधाकट व्यक्तीला थंडी, पावसात घाम फोडतात. तर कधी अबालवृध्दांचा चावा घेत घायाळ करतात. एका वर्षाला रेबीस लसीकरणासाठी 50 लाखांच्या पुढे खर्चाचा भार वाढतो आहे. 

हेही वाचा- इसलिये हम फिर लौट आये ! झारखंडचे तरुण विमानाने कोल्हापुरात -

भटकणाऱ्यां कुत्र्यांच्या टोळ्या, जागणारी गल्ल्या " कुत्र्यांना पकडा' म्हणून महापालिकेचे डोके उठवतात. गांभिर्य ओळखून महापालिकने मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम खासगी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सुरू केली. आता पर्यंत किमान सात हजाराहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण यशस्वी केले. महापालिका पथक कुत्रे पकडतात, निर्बिजीकरणानंतर पून्हा त्याच जागी कुत्र्यांना सोडतात. अशात राजेंद्रनगरातील तो मृत कुत्रा निर्बिजीकरण झालेला, त्याची योग्य ती काळजी घेतली तो तंदुरूस्त झाला. म्हणून त्या कुत्र्याला ज्या परिसरातून घेतले तिथेच सोडले.

हेही वाचा- नितीन जांभळे यांच्या ‘०५५५’चा बोलबाला -

पुढे काही दिवस तो कुत्रा परिसरात भटकला. पुढे कुत्र्यांचा मृत्यू झाला. त्याची दखल प्राणी प्रेमीने घेतली थेट दिल्लीलाच तक्रार केली, केंद्र सरकार, राज्य सरकार मार्गे जिल्हा प्रशासनला चौकशीचे आदेश आले. तिन उपायुक्त दर्जाचे अधिकारी या घटनेच्या चौकशीला लागलेत. त्या मृत कुत्र्याच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे महापालिका व पशू संवर्धनचे अधिकारी सांगितले, मात्र कोणताही तपशील दिला नाही. 

योग्य उपाययोजनांची गरज

सुत्रांनुसार चौकशी अहवाल लवकरच केंद्र सरकारला पाठवला जाईल. यात एक दोघांवर कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिका निर्बिजीकरण कामासाठी एका प्राणीप्रेमी स्वयंसेवी संस्थेला कंत्राट आहे. ते रद्द व्हावे असे प्रयत्न झाले. तशा तक्रारी पूर्वी झाल्या आहेत. मात्र ते काम त्याच संस्थेकडे आहे. अशा स्थितीत प्राण्यांची काळजी घेण्यात दोन गट जागृक आहेत. यातील एका गटाने दिल्ली दरवाजा ठोठावत कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी लावल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी कुत्र्यांचा जीवही जावू नये आणि लोकही जखमी होऊ नयेत अशी उपाय योजना राबविण्याची गरज आहे. 

संपादन - अर्चना बनगे

 



from News Story Feeds https://ift.tt/3ixKwQb
via IFTTT

No comments:

Post a Comment