नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी भोजपूरी अभिनेता आणि विद्यमान भाजप खासदार रवि किशन यांच्यावर सोमवारी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी निशाणा साधला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, सोशल मिडीयावर फिल्म इंडस्ट्रीचं नाव बदनाम केलं जात आहे. याआधी काल गोरखपूरचे भाजपाचे खासदार रवि किशन यांनी बॉलिवूड ड्रग्जच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती लोकसेभेत बोलताना सांगितली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज यांच्यात मोठे कनेक्शन असल्याची चर्चा जोर धरत आहे.
सरकार म्हणतंय, 'प्रवासी मजुरांच्या मृत्यूची आकडेवारी नाही, त्यामुळे नुकसान भरपाई नाही'
जया बच्चन यांनी आज (मंगळवारी) राज्यसभेमध्ये भाजपा खासदाराच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की,, काही लोकांमुळे आपण सगळ्या इंडस्ट्रीचं नाव खराब करु शकत नाही. काल मला खूप वाईट वाटलं. लोकसभेचा एक सदस्य जो स्वत: इंडस्ट्रीशी संबधित आहे, त्यांनी इंडस्ट्रीबाबत खूप वाईट वक्तव्य केलं. जिस थाली में खाते है, उसी में छेद करते है... असंही त्या म्हणाल्या.
शुक्रावर आढळल्या जीवसृष्टीच्या पाऊलखुणा; शास्त्रज्ञांना सापडले जैविक संयुग!
बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणाच्या मुद्यावरुन सोमवारी संसदेत चर्चा झाली. यावेळी रवि किशन म्हणाले होते की, ड्रग्जची तस्करी आणि तरुणांकडून याचं सेवन होणं हे एक मोठं संकट बनून उभं राहिलं आहे. तरुणांना भटकवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानचा कट आहे. पंजाब आणि नेपाळद्वारे ड्रग्ज संपूर्ण देशात पसरण्याचा प्रकार घडत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. पुढे ते म्हणाले की, ड्रग्जच्या नशेच्या जाळ्यात बॉलीवूडसुद्धा आहे. NCB खुप चांगले काम आहे. मी केंद्र सरकारशी सुचवू इच्छितो की, त्यांनी दोषींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी जेणेकरुन शेजारील देशांच्या कटाला आळा घालता येईल.
from News Story Feeds https://ift.tt/33nrNkw
via IFTTT


No comments:
Post a Comment