मुंबईः भारत देश सध्या कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. अशातच देश हळूहळून अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. त्यात कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद राहिल्या. मात्र आता केंद्र सरकारनं २१ सप्टेंबरपासून ज्या संस्थांना शाळा सुरु करु शकतात, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. मात्र राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. त्यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्था चालक तसंच शिक्षण तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चा केली. त्यात बहुतेक शिक्षक संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं तूर्तास शाळा सुरू करण्सास हरकत घेतली आहे. यावर आता राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.
राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती @VarshaEGaikwad pic.twitter.com/e4lugZKOso
— sakalmedia (@SakalMediaNews) September 15, 2020
तूर्तास इयत्ता १० आणि ९ वी तुकड्यां सुरू करण्याचा विचार नसल्याचीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शहरी भागास ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितलं.
अधिक वाचा- कमेंट केली आणि मानले Facebookचे आभार; कंगनाकडून मोठी चूक, होतेय ट्रोल
केंद्र सरकारनं 21 सप्टेंबरपासून ज्या संस्था शाळा सुरू करू शकतात, त्यांनी सुरू कराव्यात असं म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी दिली आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
अधिक वाचा- गतीमंद बालसुधारगृहात आणखी 23 जणांना कोरोनाची लागण
केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार, विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असेल. तसंच अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की, कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल.
State less start school end of September information Minister of Education
from News Story Feeds https://ift.tt/2FDaFPP
via IFTTT


No comments:
Post a Comment