त्यांचं मरणं जगानं पाहिलं पण; मोदी सरकारला त्याची 'खबर'च नाही - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, September 15, 2020

त्यांचं मरणं जगानं पाहिलं पण; मोदी सरकारला त्याची 'खबर'च नाही

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली: कॉंग्रेस भाजपाला पावसाळी अधिवेशनात चांगलीच घेरताना दिसतेय. पहिल्यांदा अधिवेशनातील प्रश्नकाळ रद्द केल्याने भाजपावर विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात टिका केली होती. भाजप प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरत असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोदी सरकार या अधिवेशनात चर्चा टाळत आहे. यासाठीच भाजपाने अधिवेशनातून प्रश्नकाळ रद्द केला असल्याचाही आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. 

आता कॉंग्रेस नेते राहुल गांधीनीही सरकारवर हल्ला चढविला आहे. कोरोनाकाळात किती कामगारांचा मृत्यू झाला आणि किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या याची पर्वा मोदी सरकारला नाहीये आणि याबद्दल मोदी सरकारला माहितीही नाही.  या मथळ्याखाली चार ओळींची कविता ट्विट करत राहुल गांधींनी सरकारवर टिका केली आहे. " तुम्ही मृत्यू जरी मोजले नसले तरी काय मृत्यू झाले नाहीत? पण एका गोष्टीचं दुखः आहे की सरकारला याचं काहीच वाटलं नाही. कामगारांचे मृत्यू होताना सगळ्यांनी पाहिलं, पण मोदी सरकारला याबद्दल काहीच वाटलं नाही." असं ट्विट करत राहुल गांधीनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे. 

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 49 लाखांच्या पार; मनीष सिसोदिया यांना कोरोनाची बाधा

 

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला होता. सुरुवातीला याबद्दल सरकारने थोडीफार काळजी घेतली होती पण ती पुरेशी नव्हती. जसाजसा देशात कोरोनाचा प्रभाव वाढत गेला तसं सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होतं. याकाळात लाखो लोकांच्या नोकऱ्या  गेल्या होत्या. बरेच कामगार आपापल्या गावाकडे गेले. गावाकडे जाताना प्रवासाची सोय नसल्याने बरेच जण चालत आपापल्या गावाला गेले होते. त्यात काही लोकांना अपघाताने तसेच चालत केलेल्या प्रवासाने जीव गमवावा लागला होता.

 दिलासादायक! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; अजून कमी होऊ शकतात किंमती

सध्याही भारतात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रिकव्हरी रेट 78 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 37.8 लाख लोकांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्या बाजूला जगाचा विचार केला तर, 19 दशलक्ष लोक कोरोनातून बरे झाले आहेत.  भारताने कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये ब्राझीलला मागं टाकलं आहे. भारतात आतापर्यंत 37 लाख 80 हजार 107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3iy7Wp8
via IFTTT

No comments:

Post a Comment