वॉशिंग्टन: काही दिवसांपुर्वीच चीनने भारतातील 10 हजार हाय प्रोफाइल व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा दावा काही वृत्तसंस्थानी केला होता. चीनचं हे कृत्य फक्त भारतापुरतचं नसून त्याची व्याप्ती आता अमेरिकेपर्यंत असल्याचे सिध्द झालं आहे. आता यासाठीच अमेरिकेच्या न्याय विभागाने पाच चिनी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिका आणि भारत सरकारच्या कंप्यूटर नेटवर्कसह जगातील 100 हून अधिक कंपन्या आणि संस्थांचा सायबर हल्ल्यांद्वारे डेटा आणि व्यवसायची माहिती चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
याबद्दल अमेरिकेचे डेप्युट अॅटर्नी जनरल जेफ्री रोजेन यांनी बुधवारी सांगितले की, 'या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पाच चीनी नागरिकांनी कंप्यूटर नेटवर्क हॅक केले म्हणून आणि मलेशियाच्या दोन नागरिकांवर या हॅकर्सना मदत केल्याचा आरोपही आहे.' न्याय विभागाच्या निवेदनानुसार, रविवारी मलेशियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी चिनी नागरिकांना फरारी घोषित करण्यात आलं आहे. यावेळेस रोझेन यांनी चिनी सरकारवर या कृत्याबद्दल टीकाही केली आहे.
धक्कादायक! भारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 60 टक्के रुग्ण 5 राज्यात
100 पेक्षा जास्त कंपन्यांच्या संगणक नेटवर्कवर परिणाम-
चिनी हॅकर्सवर झालेला आरोपांमध्ये या हॅकर्सनी केलेल्या हेरगिरीमुळे अमेरिका आणि परदेशातील 100 हून अधिक कंपन्यांच्या संगणक नेटवर्कवर परिणाम झाला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, संगणक हार्डवेअर, टेलिकम्युनिकेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम कंपन्यांनाही हॅकर्सनी लक्ष्य केलं आहे. तसेच हाँगकाँगमधील गैर-सरकारी संस्था, विद्यापीठे, थिंक टॅंक, लोकशाही समर्थक नेते आणि कार्यकर्ते यांनाही लक्ष्य केले गेलं आहे. चीनी हॅकर्सनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड, व्हिएतनाम आणि ब्रिटनमधील कंपन्या, तसेच लोकांच्या संगणकांनाही लक्ष्य केलं आहे.
दिग्गज लोकांवर करडी नजर-
लोकांची, संस्थांची आणि माहितीशी संबंधित रेकॉर्डचा डेटाबेस तयार केला जातो. यामागचा उद्देश हाच आहे की, लोकांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज घेणं हा आहे. चिनी कंपनी सोशल मीडियावर त्यांना ज्या लोकांवर नजर ठेवायची आहे त्यांच्या कोणत्या पोस्टवर फॉलोअर्स काय कमेंट करतात? किती लाइक आहे याचे विश्लेषण करते. याशिवाय संबंधित लोकांच्या हालचालीवरही नजर ठेवते. त्यांचा ठावठिकाणा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शोधला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डेटा एकत्र करण्यामागे नक्कीच मोठा कट शिजत असणार आहे. हायब्रिड वॉरफेअरमध्ये चिनी कंपनी आघाडीवर आहे.
बर्थडे गिफ्ट काय हवं? पंतप्रधान मोदींनी सांगितली Wish List
हायब्रिड वॉरफेअर काय आहे?
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 1999 च्या सुरुवातील हायब्रिड वॉरफेअर साठी एक रणनिती आखली. याअंतर्गंत हिंसाचार ही बाब लष्करापासून नेते, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये आणायाची होती. या नव्या युद्धाचे मास्टरमाइंड चीनचे कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसूई हे होते. हायब्रिड वॉरफेअरच्या माध्यमातून चीन शत्रू राष्ट्रात समाजात तेढ निर्माण करणं, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणं, संस्थांची लूट करणं, राजकीय नेतृत्व आणि त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रतिमा खराब करणं या गोष्टी केल्या जात आहेत. अशाच प्रकारे रशिया क्रीमियामध्ये हायब्रिड वॉरफेअरचा वापर करत आहे. मात्र चिनच्या तुलनेत रशिया कमी प्रमाणात या बाबी करत आहे. चीनने हाँगकाँगमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
(edited by- pramod sarawale)
from News Story Feeds https://ift.tt/3hF1EDa
via IFTTT


No comments:
Post a Comment