तारळे (जि.सातारा) : लेह लडाख सिमेवर तारळे विभागातील दुसाळे (पोस्ट वज्रोशी, ता. पाटण) येथील जवान सचिन संभाजी जाधव हे हुतात्मा झाले आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील यांनी आज (शुक्रवार) स्थानिक प्रशासनास माहिती कळविली आहे.
हुतात्मा संभाजी जाधव हे लेहमध्ये कार्यरत हाेते. बुधवारी (ता.16) ते हुतात्मा झाले असून त्यांचे पार्थिव पुणे येथे आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता आणण्यात येणार आहे. तेथून ते सातारा जिल्ह्यात आणले जाणार आहे.
हुतात्मा सचिन जाधव हे 111 इंजिनिअरींग रेजिमेंटमध्ये कार्यरत हाेेते. सध्या चीन बरोबर भारताचा संघर्ष सुरु आहे. हुतात्मा सचिन जाधव हे मनमिळावू स्वभावाचे हाेते. या घटनेमुळे संपुर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Video: जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले श्वानाचे प्राण
उद्या (शनिवार) शासकीय इतमामात अंत्यविधी होतील अशी प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
Edited By : Siddharth Latkar सातारा सातारा सातारा सातारा
from News Story Feeds https://ift.tt/3cdCDxQ
via IFTTT


No comments:
Post a Comment