मुंबई: भारतातील 33 टक्के पाणथळ जागा अवघ्या 40 वर्षात नष्ट झाल्या आहे. नागरीकरण, शेती आणि प्रदुषणामुळे या पाणथळा जागा नष्ट झाल्या आहेत. 2019च्या पहिल्या सहा महिन्यातच वनक्षेत्राचा विविध प्रकल्पांसाठी वापर करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे 240 प्रस्ताव केंद्र सरकारकडे आले होते. विश्व वन्यजीय निधी (डब्ल्यू डब्ल्यू एफ)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डब्ल्यू डब्ल्यू एफने लिव्हींग प्लॉनेट रिपोर्ट 2020 आज प्रसिध्द केला. या रिपोर्टमध्ये जागतिक पातळीवर होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास तसेच भारतात होत असलेल्या पर्यावरणाच्या नाशाबद्दल माहिती प्रसिध्द केली आहे. या अहवालात निती आयोगाचा संदर्भ देत भारतातील 82 कोटी जनता पाणी संकटात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतात 2030 मध्ये 1498 अब्ज घन मीटर पाण्याची गरज भासणार आहे. प्रत्यक्षात त्यावेळी प्रत्यक्षात 744 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध असेल. देशातील 20 नद्याच्या खोऱ्यापैकी 14 नद्यांच्या खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांनाही आता पासूनच पाण्याची समस्या भेडसावू लागली आहेत,असे या अहवालात नमूद आहे.
दिल्लीतील एका संस्थेने ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या आढाव्यात पहिल्या सहा महिन्यात वनक्षेत्राचा विकासकामांसाठी वापर करण्याची परवानगी मागणारे 240 प्रस्ताव केंद्र सरकारकडे आले होते. त्यातील 43 टक्के नवक्षेत्रात दुर्मिळ जैवविविधात होती. 2014 ते 2017 या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील 5 हजार 285 हेक्टर वनक्षेत्र विकासकामांसाठी वापरण्यात आले. तर, हरियाणा मधील 7 हजार 944 हेक्टर वन क्षेत्र विकासकांसाठी वापरण्यात आले होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.
पाणथळ जागांचे महत्व लक्षात घेण्यासाठी मुंबई तसेच इतर शहरात पावसाळ्यात ओढवणारी पूर परिस्थिती समस्या लक्षात घेणे गरजेचे आहे. मुंबईत कॉक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरायलाच जागा राहिलेली नाही. पाणथळ जागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. पण,मुबंईतील पाणथळ जागाच नामशेष झाल्याने पावसातील पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे नाल्यावरील ताण वाढून शहरात पाणी साचून राहते. तसेच, पशुपक्षी वनस्पती अशी जैव विविधाही पाणथळ जागा नष्ट झाली आहे.
भारतात अन्नाची नासाडी
वन्यजीवात 68 टक्के घट
जागतिक पातळीवर विचार करायचा झाल्यास गेल्या 50 वर्षात 68 टक्के वन्यजीवात घट झाली आहे. गोड्या पाण्यातील 84 टक्के जैवविविधता नष्ट झाली आहे. गेल्या 50 वर्षातील सुमारे चार हजार पृष्ठवंशीय प्राण्याचा अभ्यास यात करण्यात आला आहे. त्यानुसार गोड्या पाण्यातील तसेच परीसरातील 84 टक्के प्रजाती नष्ट झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या वन्यजीवात दोन तृतींश घट झाली आहे. यात प्रामुख्याने शेती आणि नागरीकरण हे कारण आहे. जगभरातील 125 तज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होत होतानाच कोविडसारख्या पशुजन्य आजारांचेही उगम होत असल्याचंही या अहवालात नमूद आहे. नष्ट होत असलेल्या जैवविधतेचा परिणाम इतर सजीवांसह माणसावरही होत आहे. मानवी आरोग्यवर विपरीत परिणाम होत असल्याचे या अभ्यासातून दिसत असल्याचे महासंचालक मार्को लॅब्मर्टिनी यांनी सांगितले.
----------------
(संपादनः पूजा विचारे)
33 Percent country wetlands destroyed 82 crore people water crisis
from News Story Feeds https://ift.tt/32u1UjS
via IFTTT


No comments:
Post a Comment