नवी दिल्ली- टाळेबंदीच्या काळात किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं वक्तव्य केंद्रीय कामगार मंत्र्यांनी संसदेत बोलताना केलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला. आपल्या घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात जीव गमावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात येईल का, असा प्रश्व लोकसभेत विचारण्यात आला होता.
शुक्रावर आढळल्या जीवसृष्टीच्या पाऊलखुणा; शास्त्रज्ञांना सापडले जैविक संयुग!
पावसाळी अधिवेशनात प्रवासी मजुरांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरुन मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सरकारने दिलेल्या या लेखी उत्तरामुळे विरोधकांकडून त्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. १ करोडपेक्षा अधिक मजुरांनी टाळेबंदीच्या काळात आपल्या घराची वाट धरली होती, असं कामगार मंत्रालयाने संसदेत मान्य केलं.
प्रवासी मजुरांच्या मृत्यूबाबत सरकारकडे काही डाटा उपलब्ध आहे का? असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. यावर बोलताना कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार म्हणाले की, सरकारने अशा प्रकारचा कोणताही डाटा ठेवलेला नाही. त्यामुळे यासंबंधी मदत करण्याचे कोणतेही प्रश्न उद्भवत नाहीत.
टाळेबंदीच्या काळात किती लोकांनी आपला जीव गमावला आणि किती लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या याबाबत मोदी सरकारला काहीही माहिती नाही. तुम्ही मोजले नाहीत याचा असा अर्थ नाही की मृत्यू झाले नाहीत. जगाने प्रवासी मजूरांचा मृत्यू झाल्याचे पाहिले आहे. सरकारला याबाबत काहीही संवेदना नाही का? मोदी सरकारला याची खरंच काहीही माहिती नाही का, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. त्यांनी यासंदर्भात प्रश्व विचारला आहे.
अरबी समुद्रात दिसली भारत-अमेरिका नौसेनेच्या मैत्रीची झलक; पाहा खास व्हिडिओ
कामगार मंत्रालय प्रवासी मजुरांच्या मृत्यूसंबंधी काहीही माहिती नाही, असं म्हणणं धक्कादायक आहे, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग म्हणाले. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. प्रवासी मजुरांच्या मृत्यूबाबत सरकारला काहीही काळजी नाही. टाळेबंदीच्या काळात लाखो मजुरांनी पायी, रेल्वे किंवा जमेल त्या वाहनाने आपले घर गाठले. सरकारने किमान प्रवाशी मजूरांसंबंधीचा अपूर्ण डाटा तरी जाहीर करावा, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेंबदी जाहीर केली होती. अचानक केलेल्या या टाळेबंदीमुळे अनेकांचे प्रचंड हाल झाले. मजूरांवर तर संकटच कोसळले. काम बंद झाल्याने पैसे मिळेनासे झाले. पोट भरता येत नसल्याने अनेकांनी मिळेल त्या मार्गाने आपल्या घराची वाट धरली. या प्रवासात अनेकांना आपला जीव गमवाला लागला आहे.
(edited by- kartik pujari)
from News Story Feeds https://ift.tt/3mlodAc
via IFTTT


No comments:
Post a Comment