बैरूत Lebanon Beirut Blast:लेबनॉनची राजधानी बैरूत येथे झालेल्या महाभयंकर स्फोटानं संपूर्ण जगाला हादरा बसलाय. कालपासून या स्फोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. गोदामात मोठ्या प्रमाणावर स्फोटके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लेबनॉनच्या रेड क्रॉसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या सध्या शंभरावर गेली आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळं झाल्या.
जगभरातील घडामोडींसाठी येथे क्लिक करा
2 हजार 750 टन स्फोटके
बैरूतच्या स्फोटाची पहिली बातमी आली तेव्हा, केवळ दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती. तर, जखमींची निश्चित संख्या अस्पष्ट होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 78 जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असून, 4 हजारहून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काही हॉस्पिटलमध्ये जखमींना ठेवण्यासाठी जागा नसल्याची परिस्थिती आहे. या घटने संदर्भात लेबनॉनचे पंतप्रधान हासन दिआब यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिआब म्हणाले, 'गेल्या सहा वर्षांपासून 2 हजार 750 टन अमोनियम नायट्रेट एका गोदामा साठवून ठेवण्यात आला होता. त्यासाठी कोणतिही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली नव्हती. ही अक्षम्य चूक आहे.' विषयी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लेबनॉन संरक्षण मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.
Video of the explosion#إنفجار_بيروت pic.twitter.com/dxeY23OmrJ
— Mohammad Hijazi (@mhijazi) August 4, 2020
संपूर्ण शहरात काचा फुटल्या
बैरूतच्या बंदरात स्फोट झाला असला तरी, त्याचा परिणाम राजधानी बैरूतमद्ये सगळीकडे पहायला मिलत आहे. बंदरात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेच्या जहाजाचेही स्फोटामुळं नुकसान झालंय. लेबनॉनच्या पंतप्रधान कार्यालयालाही नुकसानीला सामोरं जावं लागलंय. तर, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, संपूर्ण बैरूत शहरातील काचा फुटल्या आहेत.
from News Story Feeds https://ift.tt/3gueEvn
via IFTTT


No comments:
Post a Comment