'बाबरी मस्जिद थी, है और रहेगी'... राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ओवेसींचे ट्विट - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, August 4, 2020

'बाबरी मस्जिद थी, है और रहेगी'... राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ओवेसींचे ट्विट

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली - अयोध्या येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. देशभरातून या समारोहाची उत्सुकता दिसून येत आहे. दरम्यान खासदार आणि  एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मस्जिदला उजाळा दिलाय. 'बाबरी मस्जिद थी, है और रहेगी.' असं ट्विट ओवेसी यांनी केले आहे. 1528 मध्ये मुघल सम्राट बाबरने मस्जिद उभारले होते. 6 डिसेंबर 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनावेळी कारसेवकांन मस्जिद पाडल्याची घटना घडली होती. अयोध्येत मंदिर आणि मस्जिद यासंदर्भात मोठा वाद सुरु होता. ऐतिहासिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्याच्या  बाजूने निकाल दिला होता.  

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील काही दिवसांपासून ओवेसी भूमिपूजनासंदर्भात सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. बाबरी मस्जिद उद्धवस्त करण्यामध्ये काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यांनी यासंदर्भातही एक ट्विट केले होते. राजीव गांधी यांनी बाबरी मस्जिदचा कुलूप काढले होते. एवढेच नाही तर माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी मस्जिद उद्वस्त होताना पाहिले. काँग्रेसची संघाला साथ होती, असा आरोप ओवेसींनी केला होता.  

ओवेसी यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदींनी या कार्यक्रमात सहभागी होणे घटनेला धरुन नाही. ओवेसींनी 29 जुलै रोजी केलेल्या ट्विटमध्ये मोदींच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला होता. पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे घटनेच्या विरोधात आहे. पंतप्रधान पदी विराजमान होताना जी शपथ घेतली त्याचे उल्लंघन ठरेल, असे ओवेसींनी म्हटले होते. 400 वर्षांपर्यंत अयोध्येत बाबरी मस्जिद होती. 1992 मध्ये काहींनी ती उद्धवस्त केली, हे आम्ही विसरणार नाही, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला होता. 

राम मंदिर भूमीपूजन : लालकृष्ण अडवानी यांची भावनिक प्रतिक्रिया



from News Story Feeds https://ift.tt/3idDro9
via IFTTT

No comments:

Post a Comment