अनिल राठोड इतके लोकप्रिय का होते? - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, August 5, 2020

अनिल राठोड इतके लोकप्रिय का होते?

https://ift.tt/39XuhZS
अहमदनगर: शिवसेना उपनेते माजी मंत्री यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिक शोकमग्न झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भैय्या या नावाने राठोड यांना ओळखले जात होते. संकटकाळात प्रत्येकाच्या हाकेला ते धावून जात असल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती. राठोड यांच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा होता. ते सुरुवातीला हिंदुत्वादी संघटनेचे काम करीत होते. त्यांनी १९८७-८८ च्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातीला शहरप्रमुख व त्यानंतर जिल्हाप्रमुख अशा विविध पदावर काम केले. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ते सलग २५ वर्षे नगर शहराचे आमदार होते. ज्यावेळी १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युती होती, त्यावेळी त्यांनी अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर ते शिवसेना उपनेते म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. नगर शहरामध्ये शिवसेनाच्या माध्यमातून तसेच आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली. वाचा: नगर शहरासह जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा होता. नगरमध्ये शिवसेनेचे काम वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २००३ मध्ये जेव्हा नगर महापालिका स्थापन झाली, त्यावेळी या महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचा झाला. यामध्ये राठोड यांचा मोठा वाटा होता. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लावण्यात राठोड यांचा मोलाचा सहभाग होता. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राठोड यांची नेहमीच धडपड होती. सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला ते नेहमी धावून जात होते. त्यामुळे ते नगरकरांमध्ये ‘भैय्या’ या नावाने चांगलेच लोकप्रिय होते. वाचा: १९९० ते २०१४ अशी सलग पंचवीस वर्ष आमदार असणाऱ्या राठोड यांचा २०१४ मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. मात्र, त्यालाही न डगमगता त्यांनी त्यांनी पक्षाचे काम पुढे सातत्याने सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊन काळात गरीब व गरजू नागरिकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून राठोड यांनी अन्नछत्र सुरू केले होते. नगरमध्ये विविध भागात त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मदत पुरवली होती. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ERWcz4
via IFTTT

No comments:

Post a Comment