coronavirus - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 12, 2020

coronavirus - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

https://ift.tt/eA8V8J

जर्मनीने सध्या सव्वालाखावर रुग्ण असताना मृत्यूचा आकडा तीन हजारांच्या आतच रोखून धरला आहे. दर्जेदार आरोग्य सुविधेबरोबरच जास्तीत जास्त चाचण्या करून रुग्णांवर वेळेवर उपचार केल्याने जर्मनीला हे यश मिळालेय. याबाबत बर्लिनमधील रहिवासी गणेश सोनवणे यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद. 

प्रश्न - युरोपात जर्मनीने मृत्युदर थोपविलाय. कारण काय? 
गणेश सोनवणे - मुळात युरोपमध्ये जर्मनीची आरोग्यसेवा सर्वोत्कृष्ट, मजबूत आहे. आरोग्य विमा सगळ्यांना बंधनकारक असून, विम्याचा खर्च वैयक्तिक पगारातून कपात होतो. देशाच्या जीडीपीच्या ११.२ टक्के खर्च आरोग्य प्रणालीवर होतो. कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा सरकारने तत्काळ खबरदारी घेतली. इथं कमी लक्षणे असलेल्यांचीही चाचणी करण्यात आली. भरपूर चाचण्यांमुळे प्रसार किती झालाय, हे कळाले. याशिवाय पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य झाले. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

प्रश्न-  सरकारचे सध्याचे धोरण काय आहे? 
गणेश सोनवणे -
ज्या लोकांच्या जॉबवर परिणाम झालाय, त्यांना सरकार सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतेय. म्हणजे काही लोकांचे काम ३० ते ४० टक्के कमी झालेय. त्यामुळे त्यांना पगारही कमी मिळणार आहे. म्हणजे एखाद्याला दहा हजार रुपये महिना आहे. त्याचे ४० टक्के काम कमी झाले तर त्याला फक्त सहा हजार रुपये पगार मिळेल. त्याच्या पगारात चार हजारांचा फरक आहे. आता या कमी मिळालेल्या रकमेच्या ६० टक्के म्हणजे दोन हजार ४०० रुपये एवढी रक्कम सरकार जॉबलेस इन्शुरन्समधून देणार आहे. म्हणजेच संबंधित व्यक्तीला आठ हजार ४०० रुपये पगार मिळणार. जो आधी फक्त सहा हजार मिळाला असता. अशा योजनेमुळे नोकरी जाण्याचे संकट टळणार आहे. यापुढे सोशल डिस्टन्सिंग व वैयक्तिक स्वच्छतेवरही जास्त भर राहील. 

प्रश्न - सध्याचे जनजीवन कसे आहे? 
गणेश सोनवणे - 
देशात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येते. सुपर मार्केट, रुग्णालय, मेडिकल, सार्वजनिक सेवेच्या नोकरीसाठी बाहेर पडता येते. देशाची राजधानी बर्लिन शहरात दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी आहे; मात्र एकाच कुटुंबातील तिघे एकत्र येऊ शकतात. कमीत कमीत दीड मीटर सोशल डिस्टन्स अनिवार्य आहे. प्रत्येक राज्याचे वेगळे नियम आहेत. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

प्रश्न - आशियाई लोकांबद्दल युरोपात रोष वाढतोय? खरंय का? 
गणेश सोनवणे -
जर्मनीत तरी तसे नाही. माझं मूळ गाव निंभोरा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद). शालेय शिक्षण कन्नडला झाले. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून, बर्लिन शहरात जॉब करतोय. मी पत्नी ज्योती व मुलगी स्वरदा असे तिघे राहतो. मुळात जर्मन भाषा येत असेल तर इथले सामाजिक जीवन सोपे होते. जर्मन्सला विदेशी लोकांनी त्यांच्या भाषेत बोललेले आवडते. मी ऑफिसमध्ये बहुतांश जर्मन भाषेतच बोलतो. सगळी सरकारी कार्यालयीन भाषा ही जर्मनच आहे. विशेष म्हणजे बऱ्याच जर्मन्सला भारतीय जेवणाची फार आवड आहे. एकट्या बर्लिन शहरात चारशेवर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. अनेकजण योगाही फॉलो करतात.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 



from News Story Feeds https://ift.tt/3ceJKEK
via IFTTT

No comments:

Post a Comment