ठाणे: वैद्यकीय तपासणीत 'कोविड १९' पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी स्वत:ला 'होम क्वारंटाइन' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. खुद्द आव्हाड यांनीही 'होम क्वारंटाइन'च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही 'होम क्वारंटाइन'चा निर्णय घेतला आहे. काही पत्रकारही या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले असल्याचं समजतं. त्यांनाही सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला प्रशासनानं दिला आहे. वाचा: करोनाच्या संकट काळात लोकांना दिलासा देण्यासाठी व लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर राहून काम करत आहेत. समन्वयाच्या निमित्तानं त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्याशी सतत संपर्क येत आहे. तसंच, पत्रकारही त्यांच्या संपर्कात आहेत. कळवा-मुंब्रा भागातही आव्हाड हे पोलिसांच्या सातत्यानं संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या संपर्कातील एक पोलीस बाधित आढळून आला आहे. आव्हाड यांच्यासह काही पत्रकार व स्थानिक राजकीय कार्यकर्तेही या पोलिसाच्या संपर्कात होते. त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा सातत्यानं वाढत असून मुंबईतील एक 'हॉटस्पॉट' ठरलेल्या धारावीत आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. धारावीतील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3egRwjs
via IFTTT


No comments:
Post a Comment