संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं प्रत्युत्तर - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 20, 2020

संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं प्रत्युत्तर

https://ift.tt/2KoA0vH
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका करणारे शिवसेनेचे नेते खासदार यांच्यावर भाजपचे आमदार व माजी मंत्री यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'राजभवनाच्या नावानं बोंबा मारायला शिमगा आहे का?,' असा खोचक टोला शेलारांनी हाणला आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. वाचा: राऊत यांच्या या ट्विटला शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातूनच उत्तर दिलंय. संजय राऊत यांना शेलारांनी पत्रपंडित म्हणून हिणवलं आहे. 'राजभवनाकडे तोंड करून काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे... काय होतं ते? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो. हे त्यांना सांगायचं आहे की राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथं पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते. समजनेवाले को इशारा काफी...,' असं शेलार यांनी सुनावलंय. वाचा: 'माननीय राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. त्यांच्यावर दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा. पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का?,' असंही शेलार यांनी पुढं म्हटलंय. फोटोगॅलरी:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KhOv4z
via IFTTT

No comments:

Post a Comment