दहावीच्या निकालाबाबत ब्रेकिंग ! शिक्षणमंत्री म्हणाल्या निकाल...  - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 19, 2020

दहावीच्या निकालाबाबत ब्रेकिंग ! शिक्षणमंत्री म्हणाल्या निकाल... 

https://ift.tt/eA8V8J

सोलापूर : लॉकडाउनमुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, लॉकडाउन असल्याने उत्तरपत्रिका तपासणी करताना व तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर व चिफ मॉडरेटरकडे घेऊन जाण्यास अडचणीत येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर प्रामुख्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेऊन निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत लागेल, असा विश्‍वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्‍त केला. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेबाबत ब्रेकिंग ! थेट तिसऱ्या वर्षाचीच होणार परीक्षा 

 

एसएससी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली असून त्यांनी दहावीचा निकाल आणि उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन केले आहे. लॉकडाउननंतर दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी करुन निकाल वेळेत लावण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. कोरोना या विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करणे महत्त्वाचे असल्याने केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत यंदा विलंबाने लागणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 23 एप्रिलनंतर राज्यातील काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात ठोस नियोजन करण्याचे आदेश एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : इंजिनिअरची चिमुकली अर्विता म्हणाली ! बाबा वाढदिवस नको पण... 

लॉकडाउननंतर होईल उत्तरपत्रिकांची पडताळणी 
लॉकडाउनमुळे सर्व शिक्षक घरीच असून त्यांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. त्यांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर व चिफ मॉडरेटरकडे घेऊन जाण्यास अडचणी येत आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात येईल. एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली असून त्यांनी निकालाचे नियोजन केले आहे. निकाल कधी लागेल हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, परंतु जूनच्या मध्यावधीत निकाल लावण्याचे नियोजन सुरु आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसून त्याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. 
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री 

हेही नक्‍की वाचा : विद्यापीठ अनुदान आयोगाची ब्रेकिंग ! महाविद्यालयीन परीक्षेचा देशभर एकच पॅटर्न 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या... 

  • निकाल वेळेवर लावण्याचे नियोजन मात्र 15-20 दिवस विलंब लागेल 
  • लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिका तपासणीस लागतोय विलंब 
  • लॉकडाउन संपल्यानंतर दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी वेगाने सुरु होईल 
  • परीक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडे देण्यास लॉकडाउनचा अडथळा 
  • शैक्षणिक वर्ष काही दिवस लांबणीवर पडेल मात्र, जास्त दिवस लागणार नाहीत 


from News Story Feeds https://ift.tt/2wWDiDA
via IFTTT

No comments:

Post a Comment