'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक' - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 20, 2020

'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक'

https://ift.tt/2VJGuuu
सिंधुदुर्ग: पालघरमधील डहाणू येथील मॉब लिंचिंगच्या प्रकरणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी केल्यानंतर आता भाजपचे अन्य नेते व आमदारही सरकारला लक्ष्य करत आहेत. आमदार यांनी या घटनेच्या अनुषंगानं मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या राज्यात हाच फरक आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे. नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. 'महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही हे पालघरच्या घटनेवरून दिसतं. राज्यात काय चाललंय यावर सरकारचं अजिबात नियंत्रण नाही. लोकांचा संयम सुटत चालला आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, असं नीतेश यांनी म्हटलं आहे. 'बाळासाहेबांच्या राज्यात गर्व से कहो हम हिंदू है... उद्धव ठाकरे यांच्या राज्यात डर से रहो अगर हिंदू हो !! हा फरक आहे, असंही त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाचा: दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तर, घटनेतील १०१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या घटनेचं निमित्त करून सामाजिक वा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवरही सरकार लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नेमकं काय घडलं? पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी रात्री जमावानं तिघांची हत्या केली होती. दाभाडी-खानवेल मार्गावरून तीन जण कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत, त्यांना दगडाने ठेचून मारले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XQpiX4
via IFTTT

No comments:

Post a Comment