मुंबई: 'बेस्ट'च्या कर्मचाऱ्याचा करोनानं मृत्यू - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, April 15, 2020

मुंबई: 'बेस्ट'च्या कर्मचाऱ्याचा करोनानं मृत्यू

https://ift.tt/2xxhiPJ
मुंबई: मुंबईत करोनाबाधित आणि या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असतानाच, आता 'बेस्ट'च्या कर्मचाऱ्याचाही करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला. टिळकनगर येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. या व्यक्तीला संशयित म्हणून दाखल रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर २४ कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन आठवडे उलटल्यानंतर, ते बरे झाले असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, करोनानं मृत्यू झालेली व्यक्ती ही बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात काम करत होता. त्याला मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजार होते. ज्या कर्मचाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, किडनीचे आजार, अस्थमा आणि कॅन्सर आदी आजार असल्यास त्यांनी तूर्तास कामावर रूजू होऊ नये, असे 'बेस्ट'चे चीफ मेडिकल ऑफिसर अनिल कुमार सिंघल यांनी सांगितले.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V8bOE9
via IFTTT

No comments:

Post a Comment