मुंबई: देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. वाचा: राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bbsXm3
via IFTTT


No comments:
Post a Comment