जळगाव : माझी चार दिवसांपासून उपासमार होतेय, रेशनवर धान्य मिळत नाही, अशी तक्रार दिल्ली गृहमंत्रालयात आज पिंप्राळा येथील तरुणाने केली होती. त्यामुळे लागलीच पुरवठा अधिकारी, तहसीलदारांनी त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला धान्य, किराणा देऊन तक्रारीची दखल घेऊन तत्परता दाखविली.
हेपण वाचा - "लॉकडाउन'चा नद्यांच्या प्रदूषणस्तरावर परिणाम नाही
पिंप्राळा येथील तरुण योगेश्वर शिंपी याने दिल्ली येथे थेट गृहमंत्रालयात फोन केला होता. त्यात म्हटले, की मला चार दिवसांपासून खायला नाही, उपासमार होतेय. मंत्रालयाने जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना संबंधित तक्रार सोडविण्यास सांगितले.
श्री. सूर्यवंशी यांनी तहसीलदार वैशाली हिंगे व पथकाला महिनाभराचे धान्य, किराणा घेऊन शिंपी यांच्याकडे जाऊन देण्यास सांगितले. तहसीलदारांनी पथकासमवेत जाऊन योगेश शिंपीचे घर गाठले. त्याच्याकडे फ्रीज, कूलर, टीव्ही, मोबाईल सर्व काही आढळले. पुढे आणखी चौकशी केल्यावर समजले, की ही व्यक्ती लग्न करून कुटुंबीयांमधून पळून आली आहे. शेवटी प्रशासनाने त्याला एक महिन्याचे रेशन दिले. जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी तक्रार सोडविली व तसा गृहमंत्रालयाला फिडबॅक दिला.
from News Story Feeds https://ift.tt/3ceAXTg
via IFTTT


No comments:
Post a Comment