VIDEO: पुष्पा भावे- दादरची मुलगी ते आयर्न लेडी - Maharashtra Mazaa

Latest

Friday, October 2, 2020

VIDEO: पुष्पा भावे- दादरची मुलगी ते आयर्न लेडी

https://ift.tt/34rnJ3A
प्रसिद्ध विचारवंत यांचे आज निधन झालं. ज्यांचे कार्य आणि वाटचाल रुढार्थाने कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत बसू शकत नाही, अशी खूप कमी माणसे असतात. प्रा. पुष्पा भावे या त्यापैकी एक. मराठीच्या अध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी त्यांची अध्यापकाची भूमिका केवळ वर्गापूरतीच मर्यादित ठेवली नाही. समाजात मिसळून कार्यकर्त्यांची आणि समाजशिक्षकाची भूमिका बजावली. मराठी भाषा, मराठी नाटक हा त्यांचा अंत्यत आवडीचा विषय. अनेक गाजलेल्या नाटकांची समीक्षणे त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या लेखक-कवींच्या दोन पिढ्या त्यांना आदरार्थी 'बाई' म्हणून संबोधत असत. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही छोट्या-मोठ्या संस्थेने किंवा कार्यकर्त्याने साहित्यविषयक काही गंभीरपणे करायचे ठरवले तर पुष्पाबाई अशा ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. कार्यकर्त्यांचे बळ वाढवत असे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SoBuKF
via IFTTT

No comments:

Post a Comment