Corona Updates: दिलासादायक; देशात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा कालावधी वाढला! - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

Corona Updates: दिलासादायक; देशात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा कालावधी वाढला!

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर मागील 2 आठवड्यांपासून मंदावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा काळही मोठा वाढला आहे. मागील 4 दिवसांपासून प्रतिदिन कोरोनाचे रग्णही 70 हजारांच्या खाली आढळत आहेत.

सध्या देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 70.4 दिवसांवर गेला आहे, जो ऑगस्टच्या मध्यावधीत 25.5 दिवस होता. ही आकडेवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे रुग्णांचा दुप्पटीचा काळ वाढल्याचे दिसत आहे. 

मागील 24 तासांत देशात 680 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 67 हजार 708 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. देशात आतापर्यंत 73 लाख 7 हजार 98 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर त्यातील 63 लाख 83 हजार 442 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या वर गेला असला तरी वाढलेल्या रिकव्हरी रेटमुळे चिंता कमी झाली आहे. देशात आतापर्यंत 63 लाख 1 हजार 927 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तसेच देशातील रिकव्हरी रेट 87.05 टक्क्यांपर्यंत गेला आहे. भारतात कोरोनातून बरे झालेले रुग्ण जगातील देशांच्या यादीत सर्वोच्च ठरले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अजून एक दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9 लाखांच्या खाली गेले आहे. सध्या 8 लाख 12 हजार 390 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील कोरोना रुग्णांच्या चाचण्या प्रतिदिन 10 लाखांपेक्षा जास्त होत आहेत. यामुळे कोरोना रुग्ण ट्रेस होण्यास मोठी मदत होत आहे. बुधवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 11 लाख 36 हजार 183 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशभरात 9 कोटी 12 लाख 26 हजार 305 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/315Vczm
via IFTTT

No comments:

Post a Comment