Corona updates: देशातील कोरोना रुग्णसंख्या 65 लाखांच्या वर; आतापर्यंत 7.8 कोटी चाचण्या - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, October 3, 2020

Corona updates: देशातील कोरोना रुग्णसंख्या 65 लाखांच्या वर; आतापर्यंत 7.8 कोटी चाचण्या

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या 65 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 75 हजार 829 नवीन रुग्णांचं निदान झालं असून 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 65 लाख 49 हजार 374 वर गेला असून दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 55 लाख 9 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या देशभरात 9 लाख 37 हजार 625 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. चिंताजनक गोष्ट म्हणजे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 1 हजार 782 वर गेला आहे.

शनिवारी देशात कोरोनाच्या 11 लाख 42 हजार 131 चाचण्या झाल्या आहेत. यापुर्वी शुक्रवारी 11 लाख 32 हजार 675 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्या होत्या. काल चाचण्यांमध्ये सौम्य वाढ दिसून आली. आतापर्यंत देशात कोरोनाच्या 7 कोटी 89 लाख 92 हजार 534 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने ( Indian Council of Medical Research ) दिली आहे. 

जानेवारी महिन्यात एका चाचणीपासून झालेली सुरुवात आज ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील 7.8 कोटींच्या वर गेली आहे. सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर उतरत असल्याचे दिसत असून त्यामध्ये देशात वाढलेल्या चाचण्या खूप महत्वपूर्ण ठरल्या आहेत. यामुळे देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

आज दुपारी 1 वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन भारतीयांशी कोरोनावरील लशींबद्दल माहिती देणार आहेत. यात कोरोनावरील लस देशात कधी उपलब्ध कधी होईल? पहिल्यांदा ती लस कोणाला दिली जाईल? 2021 मध्ये कोरोनाची लस किती लोकांना दिली जाईल? या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री हर्षवर्धन देणार आहेत. यासाठी ते आज फेसबूक लाईव्ह करणार आहेत. 



from News Story Feeds https://ift.tt/3cXjmRr
via IFTTT

No comments:

Post a Comment