मुंबईः कोविड योद्धांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालाच नाही. नुसता बोलाची खिचडी आणि बोलाचा भात, या म्हणी प्रमाणे गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तात्पुरते जुलैपासून पगार मिळाला नाही. पगाराबद्दल कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता आश्वासन पलीकडे काहीच नाही. गरीब घरातील गरजूंनी पोटासाठी महामारीच्या या भयंकर काळात आपल्या स्वतःचे जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे कोविड योध्दाच दुर्लक्षित आहेत. जवळपास 300 कामगारांना पगार मिळालं नाही आहे. यात टेक्निशियन, लॅबमध्ये काम करणारे, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे.
या कामगारांना महामारीच्या या काळात आपल्या घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत ये-जा साठी ही पैसे नाहीत. अनेक अडचणींवर मात करून ही कामगार मुंबईच्या विविध भागातून गोरेगावला कामावर येतात यात, धारावी, मुंब्रा, ठाणे, कल्याण असा लांबचा पल्ला गाठून वेळेत पोहचून आपली सेवा देत आहेत. मात्र पालिका प्रशासन यांना गृहीत धरून त्यांच्या कडे दुर्लक्ष करत आहेत.
तसेच या कामगारांशी दुजा भाव करत त्यांना हँड ग्लोवस, एन95 मास्क, सॅनिटायझर सारख्या आवश्यक वस्तूंसाठी ही नाहक त्रास दिला जातो. सुरुवातीला पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली जात होती. मात्र सध्या त्याऐवजी 20 लीटरचे जार उपलब्ध करून दिले आहेत. मात्र जार मधील पाणी संपल्यावर ही नवीन जार लावण्यात विलंब होतो. त्यामुळे अनेक वेळी रुग्णांना ही त्रास सहन करावा लागत आहे. अतिदक्षता विभागात काम करण्यासाठी स्लीपर ही मिळत नाही. त्याच वेळी पालिकेच्या रोलवर असलेले कामगारांसाठी राहण्याची खाण्याची व्यवस्था, दररोज 300 रुपय कोरोना भत्ता दिला जात आहे. तसेच त्यांना पन्नास लाखांचा विमा कवच ही आहे.
कोविड योद्धांना स्वताः चे रक्षण करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य एन 95 मास्क, हाथ मोजे, सॅनिटायझर सारख्या वस्तू ही मुबलग उपलब्ध करून दिले जात नाही. पालिकेचे रोलवर असलेले कर्मचारी रुग्णाचे डायपर बदलण्यास नकार देतात आणि या अस्थायी कामगारांना जबरदस्तीने बदलण्यास भाग पाडतात.
नियमाप्रमाणे दुपारी काम संपल्यावर भोजन मिळायला हवा मात्र अनेक वेळी या योद्धांना उपाशी पोट राहवे लागते आणि तसेच घरी परतावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात यांना एनर्जी ड्रिंक दिले जात होते. मात्र ते ही गेल्या 10 जुलै पासून बंद केले आहे.
या योद्धांना कोणत्या ही प्रकारचे इन्शुरन्स नाही. तसेच जर कामावर असताना कोविडचा संसर्ग झालं तर त्यानंतर गैरहजर राहिल्यावर पगार ही कापून मिळणार.
नाव न छापण्याच्या अटीवर अस्थायी कर्मचारी
पालिका कर्मचारी हेच काम करतात का?आम्ही मानव नाहीत का?आमच्याशी दुजाभाव का?असा संतप्त सवाल अस्थायी कोविड योद्धाने विचारलं आहे. आमच्याशी अधिकारी नीट वागत नाहीत साधी भेट ही देत नाही. मात्र काम काढण्यासाठी यांना स्थायी करण्याचे खोटे आश्वासन दिले जाते. कोविड सेंटर सुरू झाल्यापासून आमच्या आरोग्य चाचणी केली गेली नाही आहे.
सर्वांना नियमित वेतन दिले जाते. तसेच काही कर्मचारी हे पी दक्षिण विभाग अंतर्गत तर काही नेस्को अंतर्गत काम करत आहेत आणि त्यांच्या वेतनाची जबाबदारी आमची नाही. मला अजून कोणीही या बद्दल तक्रार केली नाही. जर कोणालाही काही अडचण असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावे.
डीन नेस्को कोविड सेंटर नीलम अंदराडे
-----------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Temporary staff Nesco Covid Center went unpaid for 3 months
from News Story Feeds https://ift.tt/3l9uoGb
via IFTTT


No comments:
Post a Comment