मला बटन सापडलं... तो जोरात ओरडला. आणि त्याने भारत आणि ग्रीक यांच्यात व्यापार-उदिम असण्याचा एक पुरावाच शोधून काढला. हि घटना आहे केरळमधील. एका विद्यार्थ्याला आपल्या काकांच्या घराच्या मागील बागेत एक अशी गोष्ट सापडली आहे ज्यामुळे केरळचे नाते थेट रोमन साम्राज्याशी जोडलं जाऊ शकेल. ही घटना आहे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील पट्टानम गावातील. बारावीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव पविथा पीए असं आहे. पट्टानममध्ये पविथाचे काका केएस सुकुमारन राहतात. त्यांच्या घराच्या मागे सुरु असणाऱ्या खोदकामात त्याला काही ऐतिहासिक गोष्टी सापडल्या आहेत.
त्याला सुरवातीला बटनसारखी एक गोष्ट सापडली. पविथाला बटनासारखी वस्तू मिळताच तो जोरात ओरडला की मला काहीतरी सापडलं. केरळच्या पामा इन्स्टि्युटचे डायरेक्टर पीजे चेरियन यांनी त्याला ब्रशने साफ केलं. त्यानंतर असं लक्षात आलं की, ही बटनासारखी दिसणारी वस्तू ही काही सामान्य गोष्ट नव्हे. त्यावर ग्रीक पुराणातील एक रहस्यमयी अशी आकृती कोरलेली आहे. ती आकृती स्फिंक्सची आहे. या स्फिंक्सला जादुई ताकदीसाठी ओळखलं जायचं.
Greco-#Roman sphinx seal and other artefacts discovered in #India's Kerala region. https://t.co/FcAfWN13xe #RomanArchaeology #Archaeology #RomanHistory #AncientHistory pic.twitter.com/HQ1a4mDRRN
— Roman Archaeology News (@RomArchable) September 22, 2020
यानंतर पुढच्या तीन महिन्यात तज्ञांसोबत या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत रोमच्या टोर वर्गाटा युनिव्हर्सिटीच्या आर्कियोलॉजी अँड हिस्ट्री ऑफ ग्रीक अँड रोमन आर्ट हा विषय शिकवणारे गुलिया रोका देखील सामिल होते. ही बटनसारखी गोष्ट रोमन साम्राज्याच्या आधीच्या अगस्तस सीजर नावाच्या शासकाच्या शासनात वापरली जाणारी एक सील रिंगसारखी वस्तू आहे. अगस्तस हा पहिला रोमन शासक होता ज्याचं राज्य इसवीसन पुर्व 27 ते इसवीसन 14 पर्यंत होतं.
हेही वाचा - कोरोना लस कधी येणार आणि सर्वात आधी कोणाला मिळणार?
सुकुमारन यांना घराच्या मागे खोदकाम करताना ही वस्तू 25 एप्रिलला मिळाली होती. ही गोष्ट सापडल्याने बऱ्याच गोष्टींना आता ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे. पेरियार नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे छोटं हे गाव हे मुझिरीस असू शकतं. हे पहिल्या शतकाच्या दरम्यान एक बंदर असलेलं शहर असू शकतं. एक असं शहर जिथं जगातील वेगवेगळ्या भागातील व्यापारी येऊन व्यापारउदीम करत असावेत. ही वस्तूसुद्धा या व्यापारांद्वारेच इथवर पोहोचली असावी, असा अंदाज आहे.
सुकुमारन यांच्या घराच्या मागच्या भागात 2007 पासून खोदकाम सुरु असून त्याचे 9 टप्पे झाले आहेत. सध्या दहावा टप्पा सुरु आहे. आणि आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा शोध आहे. एका रोमन छापाची अंगठी स्फिंक्ससोबत इथवर कशी येऊ शकते? चेरियन म्हणलंय की, अनेक शक्यता आहेत. व्यापारांनी हे आणलेलं असू शकतं. ही एकच शाही मोहोर नाही तर हजारो मोहोरा असणार आहेत. स्वत: सम्राटाद्वारे त्याचा वापर केला गेलेला असू शकतो. त्यांना एखाद्या स्टॅम्प रुपाने वापरले जात असावे.
from News Story Feeds https://ift.tt/30xPk1M
via IFTTT


No comments:
Post a Comment