तुमच्यामुळे आम्ही आहोत,आमची साथ सोडू नका " : अभिनेता अक्षय कुमारचे चाहते, प्रेक्षकांना भावनिक आवाहन - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, October 4, 2020

तुमच्यामुळे आम्ही आहोत,आमची साथ सोडू नका " : अभिनेता अक्षय कुमारचे चाहते, प्रेक्षकांना भावनिक आवाहन

https://ift.tt/eA8V8J

मुंबई - बॉलीवूडच्या सध्याच्या परिस्थितीवर अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे. व्हिडिओव्दारे त्याने संवाद साधला आहे. त्यात त्याने बॉलीवूडमध्ये होणा-या बदलांचा आढावा घेतला आहे. काही गोष्टींबाबत आपल्याशी बोलणे महत्वाचे वाटते. आम्ही जरी सगळे स्व;तला स्टार म्हणवत असलो तरी बॉलीवूडला मोठे करण्यात प्रेक्षकांचा वाटा सगळ्यात महत्वाचा आहे. असे त्याने म्हटले आहे.

अक्षय म्हणतो, खरं सांगायचे झाल्यास आज मोठ्या जड अंतकरणाने मी तुमच्याशी संवाद साधत आहे. गेल्या काही दिवसांपासून खुप काही गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता भरलेली दिसून येत आहे. त्यासगळ्याचा परिणाम आपल्यावर जाणवतो आहे. त्यामुळे काय बोलावे, कुणाशी बोलावे हा प्रश्न मला आता पडला आहे. 
 आम्ही फक्त एक कुठली इंडस्ट्री नसून आपल्या देशाची संस्कृती, त्याचे महत्व या माध्यमातून सा-या जगभरात पोहचवले आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. ज्यावेळी देशातील सर्वसामान्य लोकांच्या भावनांचा प्रश्न समोर आला त्यावेळी चित्रपटांतून त्यांच्या भावना, वेदना मांडण्याचा प्रयत्न आम्ही कलावंतांनी केला आहे. मग त्यात एखादा अँग्री यंग मॅनचा आक्रोश, गरीबी, बेकारी, भ्रष्टाचार यासारख्या अनेक गोष्टींना चित्रपटाने महत्वाचे स्थान दिले आहे. सर्वसामान्य माणसाला तोंड द्याव्या लागणा-या समस्यांना बॉलीवूडने प्राधान्यक्रम दिला आहे.

मला माध्यमांचा प्रभाव आणि त्यांचा दरारा याविषयी नेहमीच आदर वाटत आला आहे. आपल्या माध्यमांनी योग्य त्यावेळी योग्य त्या माणसांसाठी आवाज उठवला नाही तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणे कठीण होऊन जाईल. माध्यमांनी त्यांचे काम सुरु ठेवावे मात्र हे करत असताना तारतम्य बाळगावे. कारण कुणाबद्दल दिलेली एक नकारात्मक बातमी ही एखाद्या कलावंताच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला मातीमोल करतो. चाहत्यांनी आम्हाला बनवले आहे. त्यांच्यामुळे आम्ही आहोत. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. फक्त आमची साथ सोडू नका. आम्हाला साथ द्या. ही तुम्हाला विनंती आहे.

आता अशावेळी लोकांच्या  मनात आमच्याविषयी राग असेल तर तो राग मी समजू शकतो. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या झालेल्या मृत्युमुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. यासगळ्या प्रकरणामुळे बॉलीवूडला मोठ्या अडणीतून जावे लागत आहे. तसेच या घटनेने आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे दाखवून दिले आहे. बॉलीवूडमधल्या अशा अनेक गोष्टींवर बारकाईने विचार करावा लागेल हे यानिमित्ताने समोर आले आहे. बॉलीवूडमधील ड्रग्ज आणि अंमलीपदार्थांचे सेवन याबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय शोधावा लागणार आहे.

प्रत्येक व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत. त्यात काही अनिष्ठ गोष्टीही असतात. याचा अर्थ त्या व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती त्या संबंधित प्रकरणात सहभागी आहे असे म्हणता येणार नाही. ड्रग्ज याप्रकरणावर एनसीबी तसेच इतर जी तपासयंत्रणा काम करत आहे ती याचा सोक्षमोक्ष लावेल. यात शंका नाही. बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकार याप्रकरणात त्यांना सहकार्य करेल हे मी आपणास सांगतो. पण माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, लोकांनी पुर्ण बॉलीवूडला बदनाम दुनियेच्या  या दृष्टिकोनातून पाहणे चूकीचे आहे. कृपया असे करु नका. हे बरोबर नाही. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3niRID9
via IFTTT

No comments:

Post a Comment