तुम्ही आमचे पालक, एकवेळ थोबाडीत मारा पण....; चंद्रकांत पाटील यांची खडसेंना भावनिक साद - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, October 8, 2020

तुम्ही आमचे पालक, एकवेळ थोबाडीत मारा पण....; चंद्रकांत पाटील यांची खडसेंना भावनिक साद

https://ift.tt/2SCOlsy
मुंबईः पक्षांतर्गंत अन्याय झाल्यामुळं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनीही एकनाथ खडसे यांना भावनिक साद घातली आहे. एकवेळ चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यांसमोर (चॅनेल) जाऊ नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बुधवारपासून एकनाथ खडसे हे मुबंईत ठाण मांडून असल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने अधिक जोर धरला आहे. मुंबईत खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची दाट शक्यता देखील वर्तविली जात आहे. मात्र, भाजपाच्या नवनियुक्ती राज्य कार्यकारणीची बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळं या चर्चांनी काही काळासाठी पूर्णविराम मिळाला होता. वाचा: 'खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा चर्चा माध्यामांकडून होत आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत. खडसे आमचे समजूतदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33GpY3C
via IFTTT

No comments:

Post a Comment