पूरग्रस्तांची नुकसान भरपाई देण्यासाठी घेतली लाच; अन्... - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, October 8, 2020

पूरग्रस्तांची नुकसान भरपाई देण्यासाठी घेतली लाच; अन्...

https://ift.tt/3iKDjfu
कोल्हापूरः पुरग्रस्तांसाठीची नुकसान भरपाई देण्यासाठी दोन लाखाची लाच स्वीकारताना मत्स्त्य व्यवसाय विकास अधिकारी प्रदीप केशव सुर्वे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मत्स्य विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी कोल्हापुरात महापूर आला होता. त्यामुळे तक्रारदाराच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या. त्यानंतर महसूल विभागाने तक्रादाराच्या संस्थेच्या जलाशयाचा पंचनामे केले. त्यानुसार नुकसान भरपाईचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्सविभाग कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. हा प्रस्ताव राज्य सरसकारकडे पाठवण्यात आला. राज्य सरकारकडून त्यांना २६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. ती सहाय्यक आयुक्त मत्स विभागाच्या खात्यावर जमा झाली. ही रक्कम देण्यास प्रभारी सहाय्यक आयुक्त सुर्वे यांनी टाळाटाळ सुरू केली. त्यांनी एकूण नुकसान भरपाई पैकी ४० टक्के म्हणजे १० लाख रुपये रक्कमेची लाच मागितली. लाच न दिल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितले. तक्रारदाराने अनेकदा भेट घेऊनही सुर्वे याने भरपाईची रक्कम देण्यास नकार दिला. किमान सात लाख तरी द्या असा आग्रह तो करू लागला. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला. त्यामध्ये सुर्वे याने दहा लाख रुपयाची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर पाच लाख रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार प्रथम दोन लाख रुपयांचा हप्ता आज गुरुवारी देण्याचे ठरले. सुर्वे यांनी तक्रारदारांला फोन करुन लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात बोलावले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कार्यालयातच दोन लाख रुपयांची लाच घेताना सुर्वे याला अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त सीमा मेंहदळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, अजय चव्हाण, रुपये माने, मयूर देसाई, चालक सूरज अपराध यांनी कारवाईत सहभागी झाले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lrlHqJ
via IFTTT

No comments:

Post a Comment