मुंबई: संसर्ग झाल्यानंतर चार दिवसांच्या आत कोविडची चाचणी करून घेणाऱ्या व्यक्तींचे निकाल निगेटिव्ह येण्याची शक्यता 67 टक्के जास्त असते. विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच चाचणी केली असेल तर असे घडण्याची शक्यता अधिक असते. विषाणूंची संख्या चाचणीत दिसण्याइतकी जास्त नसल्याने विषाणूंचे अस्तित्व तपासणीच्या साधनांमध्ये पकडले न जाण्याची शक्यता असते. यामुळे चाचणी पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे असल्याचे फोर्टीस रूग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन डायरेक्टर डॉ. फराह इंगळे यांनी सांगितले.
एखादा रुग्ण विषाणूच्या धोक्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच म्हणजे लक्षणे दिसू लागण्यापूर्वी त्याची कोविड-19 चाचणी करण्यात आल्यास अशा चाचणीमध्ये चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर त्यांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या असूनही त्या नसल्याचे निदर्शनास येते. यामध्ये चाचणीचा चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्टही येण्याची शक्यता असते. म्हणजे एखादी व्यक्ती संसर्गबाधित नसतानाही ती असल्याचे किंवा शरीरात अँटिबॉडीज नसतानाही त्या असल्याचे दिसून येऊ शकते असे ही डॉ फराह यांनी सांगितले.
अधिक वाचाः कोरोनासाठी हाफकिनकडून पुण्याला सर्वाधिक वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा
विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका अधिक असलेल्या व्यक्तींवर संसर्ग झाला आहे असे गृहित धरूनच उपचार केले जायला हवेत,असंही डॉ फराह सुचवतात. जर चाचणीसाठी वापरलेल्या स्वॅबवर विषाणूबाधित पेशी चिकटल्या नाहीत, किंवा संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात विषाणूंची पातळी खूपच कमी असेल तर काही आरटी पीसीआर चाचण्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळू शकतो. यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्यांचा आपवाल ही बऱ्याचदा चुकीचा आला असल्याचंही त्या सांगतात.
एखाद्याचा चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणि चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हे दोन्ही योग्य नाहीत. चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यास आपल्याला संसर्ग झाला नसल्याचे समजून निश्चित झालेली व्यक्ती पुरेशी खबरदारी घेणार नाही आणि त्यातून सामाजिक स्तरावर संसर्गाचा धोका वाढेल. लक्षणे दिसून न येणे किंवा लक्षणे दिसली तरीही ती कोविड-19 ची नसावीत असा समज होणे या दोन्ही कारणांमुळे असा धोका वाढू शकेल याकडे ही डॉ.फराह यांनी लक्ष वेधले.
मुंबईतल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संसर्गाची शक्यता अधिक असलेल्या ठिकाणी वावर असलेल्या आणि आजाराची लक्षणे दिसणाऱ्या एखाद्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तरीही अशा व्यक्तीच्या शरीरात विषाणू आहेत असेच धरून चाललेले अधिक चांगले. दुसरीकडे संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या भागांमधील एखाद्या लक्षणे नसलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास ती व्यक्ती सुटकेचा नि:श्वास टाकू शकते. मात्र कंटेन्टमेंट झोन मधील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी गांभिर्याने घेणे गरजेचे असल्याचे ही डॉ फराह पुढे म्हणाल्या.
चाचणीसाठी नमुना कधी घेतला, रुग्णामधील व्हायरल लोड किती आहे, नमुना पेशी गोळा करण्याची पद्धत, नमुन्याची ने-आण आणि चाचणी दरम्यान वापरले गेलेले रीजन्ट या सर्वांमुळे चाचणीचा निकाल बदलू शकतो आणि चुकीचा निगेटिव्ह किंवा चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळू शकतो. पण विषाणूच्या संसर्गात आल्यावर, एखाद्या हॉटस्पॉटला भेट दिल्यावर किंवा लक्षणे दिसू लागल्यावर तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला डॉ फराह यांनी दिला.
--------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Understand meaning report negative false negative report 67 percent infected people
from News Story Feeds https://ift.tt/2GAmDdN
via IFTTT


No comments:
Post a Comment