पुणे : जिल्ह्यात मंगळवारी (ता.6) दिवसभरात 1 हजार 739 नवे कोरोना
रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 634 जण आहेत. दरम्यान, 2 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2 लाख 56 हजार 485 झाली आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ 33 हजार 728 सक्रिय (पॉझिटिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 19 हजार 76 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित 14 हजार 652 जणांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत
आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येचे प्रमाण
सुमारे अकरा हजारांनी कमी झाले आहे.
आणखी वाचा - पुणे-लोणावळा लोकल आता सुरू होणार!
पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 449, जिल्हा
परिषद कार्यक्षेत्रात 465, नगरपालिका क्षेत्रात 133 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 49 नवे रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात 58 जणांचा मृत्यू झाला
आहे. यामध्ये शहरातील सर्वाधिक 30 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 14, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 8 आणि नगरपालिका क्षेत्रातील 6 रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही
काल (ता.5) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.6) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 925 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 857, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 388, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 103, नगरपालिका क्षेत्रातील 399 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 178 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 300 जण आहेत. आतापर्यंत 12 लाख 33 हजार 265 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 लाख 96 हजार 990 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांपैकी आज दिवसभरात 9 हजार 557 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संस्थानिहाय रुग्णालयांत दाखल रुग्ण(कंसात घरात उपचार घेत असलेले)
- पुणे महापालिका --- 4 हजार 821 (9 हजार 363)
- पिंपरी चिंचवड पालिका --- 3 हजार 57 (1 हजार 541)
- जिल्हा परिषद --- 8 हजार 41 (2 हजार 948)
- नगरपालिका --- 2 हजार 205 (691)
- कॅंटोंमेंट बोर्ड --- 952 (109).
from News Story Feeds https://ift.tt/3iCdEG2
via IFTTT


No comments:
Post a Comment