मुंबईत आणखी 565 झाडांचा बळी, सातरस्ता परिसरातील झाडांवर पालिकेच्या नोटीसा - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

मुंबईत आणखी 565 झाडांचा बळी, सातरस्ता परिसरातील झाडांवर पालिकेच्या नोटीसा

https://ift.tt/eA8V8J

मुंबईः सातरस्ता येथील प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसाठी 565 झाडांचा बळी जाणार आहे. पालिकेने सातरस्ता परिसरातील झाडांवर या संदर्भातील नोटीसा चिटकवून त्याची माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे झाडे वाचवण्याचा मुद्दा पुढे करून आरे कारशेड कांजूरला हलवणा-या शिवसेननेचीच सत्ता महापिलिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुटप्पी भुमिकेबाबत पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली.

पालिकेचे सातरस्ता येथे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहे. यासाठी पालिका 100 कोटी रूपये खर्च करणार आहे. सातरस्ता, महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून पालिकेने हे दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. या उड्डाणपुलांमुळे  या परिसरातील वाहतूक थेट वरळी नाका तसेच हाजीअली जंक्शनपर्यंत जाणार असल्याने वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

अधिक वाचाः  लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट

सातरस्ता परिसरात जे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत त्या मार्गात अनेक जुनी झाडं आहेत. अशी 565 जुनी झाडं तोडावी लागणार आहेत. त्यातील 265 झाडे पहिल्या टप्प्यात प्रभावित होणार आहेत. त्यातील काही झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून या झाडांवर नोटीसा चिटकवण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकतर जुन्या आणि मोठ्या झाडांचा समावेश आहे.

या नोटीसांमध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1995 मधील तरतूदीनुसार वृक्ष प्राधिकरणाने झाडे काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून कार्यकारी अभियंता (ब्रीज) शहर / उत्तर यांस कडून अर्ज प्राप्त झाले असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार डी,ई आणि जी दक्षिण विभागादरम्यान महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई मोझेस रोड आणि केशवराव खाडे मार्ग यावर दोन वाहतूक उड्डाणपूल बांधण्यास आड येणारी झाडे काढण्यास प्रस्तावित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचाः पश्चिम रेल्वे मार्गावर 15 ऑक्टोबरपासून AC लोकल सुरु होणार

पालिकेच्या या उड्डाणपुलाच्या प्रस्तावावर पर्यावरणवाद्यांनी जोरदार विरोध केला आहे. धोबीघाट परिसरातील विकासकांच्या नव्या फ्रकल्पांसाठी या उड्डाणपुलांचा घाट घातला जात असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनचे ट्रस्टी तसेच आरटीआय कार्यकर्ते गॉडफ्राय पिंपेटा यांनी केलाय. यामुळे जनतेच्या करातील 100 कोटी रूपयांची उधळपट्टी करण्यात येत असून यामुळे पर्यावरणाची कधीही न भरून निघणारी हानी होणार असल्याचे सांगत या प्रकल्पाला विरोध केला आहे. वेळ पडल्यास न्यायलयीन लढाई लढण्याचा इशारा ही पिंपेटा यांनी दिलाय.       

विभाग एकूण झाडे कापणार एकूण पुनर्रोपीत करणे
     
डी 45 11
29 6
जी दक्षिण 79 30

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Another 565 trees will cut down BMC notices on trees in Satarasta area



from News Story Feeds https://ift.tt/3kaFP0p
via IFTTT

No comments:

Post a Comment