मुंबईकरांनो अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्यापासून KEM मध्ये सुरु होणार कोविशील्ड लसीच्या चाचण्या - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, September 17, 2020

मुंबईकरांनो अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्यापासून KEM मध्ये सुरु होणार कोविशील्ड लसीच्या चाचण्या

https://ift.tt/eA8V8J

मुंबई : कोरोनाच्या संवेदनशील काळात अखेर एक आशेचा किरण समोर  मिळतोय. DGCI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबईतील KEM रुग्णालयाला कोविशील्ड या कोरोना लसीची चाचणी करण्यास सांगितलंय. त्यामुळे आता उद्यापासून मुंबईतील KEM रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेल्या आणि महाराष्ट्रातील पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने भारतात दिल्या जाणाऱ्या कोविशील्ड (Covishield) या लसीची चाचणी सुरु होणार असल्याची माहिती समोर येतेय. मधल्या काळात UK मध्ये या लसीच्या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाला साईड इफेक्टस जाणवले होते. त्यानंतर या लसीच्या जगभरातील चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा या चाचण्या करण्यास सुरवात झालेली आहे.  

महत्त्वाची बातमीमुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती

या चाचणीत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचा विशेष विमा उतरवण्यात आलाय. यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे, कोविशील्ड चाचणीतील एकूण स्वयंसेवकांसाठी म्हणजेच १६० स्वयंसेवकांसाठी एक समूह विमा काढण्यात आलाय. हा विमा तब्बल १० कोटी रुपयांचा आहे. तर दुसरा विमा म्हणजे, प्रत्येक व्यक्तीसाठी ३५ लाखांचा विमादेखील काढण्यात आलाय. ज्यामध्ये चाचणीमुळे एखाद्या स्वयंसेवकाला कोणता साईड इफेक्ट किंवा बडा झाली तर त्या स्वयंसेवकाच्या औषधांसाठी हा विमा उतरवण्यात आलाय. या स्वयंसेवकांच्या RT-PCR चाचण्या केल्या जातील आणि त्यानंतर पुढील चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना चार डॉस दिले जातील असं KEM चे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी माध्यमांना सांगितलंय.

महत्त्वाची बातमी : ठाण्यात मालमत्ता करावरून भाजप-मनसे आक्रमक; सत्ताधारी शिवसेनेची कोंडी 

दरम्यान या चाचण्यांसाठी ज्या व्यक्तींची स्वयंसेवक म्हणून निवड झाली आहे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांनंतर रुग्णालयातील एथिक कमिटीची परवानगी घेऊन या चाचण्या सुरु होतील. याचसोबत मुंबईतील नायर नायर रुग्णालयातही कोविशील्ड लसीच्या चाचण्या सुरु करण्यात येणार आहेत. 

KEM hospital of mumbai to start covishield vaccine testing from saturday



from News Story Feeds https://ift.tt/2EhpB5S
via IFTTT

No comments:

Post a Comment