पुणे: वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेले उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या धक्कातंत्राचा अनुभव पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आज आला. अजित पवार हे आज सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाच्या पाहणीसाठी पोहोचले. अर्थात, या साऱ्याची कल्पना असल्यानं अधिकारीही सज्ज होते. अजितदादांनी मेट्रो प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांसोबत मेट्रो प्रवासही केला. वाचा: पुण्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुण्यात आहेत. ही आढावा बैठक आज दुपारी होणार आहे. मात्र, पुण्यात असल्यानं आज अचानक त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यासाठी सकाळी सहा वाजताच ते फुगेवाडीत दाखल झाले. अजितदादा मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं समजल्यानं व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सज्ज होते. सुरुवातीला अजित पवार यांनी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत चर्चा करून पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाची पाहणी केली. तेथील तिकीट विक्रीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. तिथेच मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी तुकाराम नगर ते पिंपीर असा मेट्रो प्रवास केला. ब्रिजेश दीक्षित हेही त्यांच्यासोबत होते. दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZOygEb
via IFTTT


No comments:
Post a Comment