नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दंगलीच्या आरोपपत्रात सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचे नाव आल्याने त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टिका केली आहे. याबद्दल बोलताना सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दडपशाहीने दबाव आणा असे आदेश दिले आहेत. याबद्दल येचुरी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर हल्ला केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिल्ली दंगलींशी संबंधित अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. या दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात सीताराम येचुरी, स्वराज इंडियाचे पक्षाचे योगेंद्र यादव, प्राध्यापक अपूर्वानंद, अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष, चित्रपट निर्माते राहुल रॉय आणि इतर अनेकांची नावे आहेत.
हे वाचा - कोरोनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; ट्रम्प यांची धक्कादायक विधाने जगजाहीर
56 लोग दिल्ली की हिंसा में मारे गए। ज़हरीले भाषणों का video है, उन पर कार्यवाई क्यों नहीं हो रही है? क्योंकि सरकार ने आदेश दिया है कि विपक्ष को लपेटा जाए, किसी भी तरह से। यही है मोदी और BJP का असली चेहरा, चरित्र, चाल और चिंतन। विरोध तो होगा इसका।
— Sitaram Yechury (@SitaramYechury) September 12, 2020
सीपीएमचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आरोपपत्रात त्यांचे नाव आल्यामुळे याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल येचुरी यांनी ट्विट करत , "दिल्ली पोलिस केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. त्यामूळे भाजप त्यांच्या बेकायदेशीर उपयोग करून घेत आहे. यावरून भाजपच्या नेत्यांचे चरित्र दिसते. भाजपाला शांततेत केलेल्या निदर्शनांची आणि विचारलेल्या प्रश्नांची भीती वाटते यासाठीच आम्हाला शक्तीचा गैरवापर करून भाजप रोखू पाहत आहे." अशी टिका केला आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोदी सरकार फक्त संसदेत प्रश्नांना घाबरत नाही तर पत्रकार परिषद घेण्यासही घाबरत आहे. तसेच आरटीआयला उत्तर देण्यासही मोदी सरकार नेहमी टाळाटाळा करत आले आहे. मोदींचे वैयक्तिक फंड असोत किंवा त्यांची पदवी याबद्दल उत्तरे देण्यास मोदी सरकार घाबरत आहे. सरकारच्या सर्व असंवैधानिक धोरणांचा आणि असंवैधानिक उपायांच्या विरोधात आम्ही कायम राहू, अशी टिका सिताराम येचुरी यांनी केली आहे.
from News Story Feeds https://ift.tt/32qu6nH
via IFTTT


No comments:
Post a Comment