मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. आज बरेच दिवसानंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्यानं सर्वांचंचं लक्ष त्यांच्या संवादाकडे लागून राहिलं आहे.
राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा, कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण. तसंच मराठा आरक्षण यावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
कोरोनावर काय बोलतील?
सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार कसा रोखावा असा महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्यात सध्या अनलॉक सुरु झालं आहे. त्यात मंदिरं, रेस्टॉरन्ट सुरु करण्याची मागणी केली जात आहे. लोकल रेल्वेही सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
अधिक वाचाः कोविडचा रिकव्हरी रेट घटला, ११ दिवसात २ टक्क्यांनी घट
मराठा आरक्षणावर काय बोलणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक पेटून उठले आहेत. न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपनं ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे.
हेही वाचाः धक्कादायक, धारावीसह या भागात वाढतोय कोरोनाचा प्रार्दुभाव
कंगनावर काय बोलणार?
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत पहिल्यापासून वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्यानंतर कंगनानं ड्रग्स प्रकरण, तसंच महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. शिवसेना आणि कंगना असा वाद रंगला आहे. कंगनानं वारंवार शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध वादग्रस्त ट्विटही केलेत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Chief Minister Uddhav thackeray live at 1 pm today interact with the people
from News Story Feeds https://ift.tt/2DUjlRa
via IFTTT


No comments:
Post a Comment