पुणे: महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे असा सूचक इशारा देणारे मुख्यमंत्री यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी खरोखरच मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. तरच त्यांना वस्तूस्थिती समजेल, असं सांगतानाच, 'कंगना राणावतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला,' असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. ते प्रामुख्यानं करोना व मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलले. मात्र, व सुशांतसिंह राजपूतच्या निमित्तानं महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या बदनामीचं हे जे राजकारण सुरू आहे त्यावर जरूर बोलणार, सगळे धोके लोकांसमोर मांडणार, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याला पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. वाचा: 'विरोधी पक्ष राजकारण करतोय असा मुख्यमंत्र्यांचा दावा असेल तर कंगनाचा विषय महाराष्ट्रात कुणी सुरू केला? शिवसेनेने ना?,' असा प्रश्न पाटील यांनी केला. सुशांतसिंहच्या प्रकरणात एफआयआर दाखल करून मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळं तुम्ही ज्याला 'मास्क' म्हणता तो मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे,' असा टोला पाटलांनी हाणला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी मास्क लावल्यामुळं त्यांना विरोधी पक्ष राजकारण करतोय असं वाटत असले तर त्यांनी मास्क बाजूला ठेवून वस्तूस्थिती समजून घ्यावी. सुशांत प्रकरणात केंद्राच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत जी कारवाई केली आहे त्याला राजकारण नाही, तर प्रशासकीय कार्यपद्धती म्हणतात, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kescN3
via IFTTT


No comments:
Post a Comment