इस्त्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन; पंतप्रधानांनी केली घोषणा - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, September 13, 2020

इस्त्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन; पंतप्रधानांनी केली घोषणा

https://ift.tt/eA8V8J

जगभरातील कोरोना विषाणूचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिका, भारत आणि ब्राझील या मोठ्या राष्ट्रांसह छोट्या राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट उसळण्याची भिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्त्राईलने देशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषीत केलाय. देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून शुक्रवारपासून देशात लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येईल.

लॉकडाऊनच्या दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. शॉपिंग मॉल, सिनेमा गृह बंद राहणार असून सार्वजनिक ठिकाणी 10 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्राईलमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनतेतून संतप्त आक्रोश उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. कोरोनाच्या देशातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोक चक्क रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान नेत्यानाहू  यांच्या घरासमोर आंदोलन करत त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3micylJ
via IFTTT

No comments:

Post a Comment