सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमात मिळतोय बेघरांनाही आधार - Maharashtra Mazaa

Latest

Friday, September 11, 2020

सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमात मिळतोय बेघरांनाही आधार

https://ift.tt/eA8V8J

पुणे - वृद्धत्व म्हणजे नव्याने मिळालेले बालपणच. शरीर आणि मन जर्जर झालेल्या अवस्थेतच जिवापाड जपून बांधलेलं घरही हरविण्याची वेळ आल्यास ज्येष्ठांवर आभाळच कोसळते. पण, अशावेळी आभाळमाया देणारे कोणी मदतीला धावल्यास ज्येष्ठांना आधार मिळू शकतो. अशीच घडना लॉकडाउनदरम्यान घडली. ‘आकुबाई’ एवढेच नाव सांगू शकणाऱ्या ज्येष्ठ महिलेस संगोपन केंद्राची मदत मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमात वारजे पोलिस चौकीतून फोन आला. एक आजी रस्त्यावर फिरत असून लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीने त्यांना मदत करण्यास कोणीच तयार नाही. त्या आजीबाईंना आपले घर, नातेवाईक, मुले यांच्याबद्दल काहीच आठवत नव्हते. वृद्धाश्रमाच्या प्रमुख डॉ. अपर्णा देशमुख आणि त्यांचे सहकारी तिथे पोहचले आणि त्यांना वृद्धाश्रमात आणले. आजींसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणीही केली. त्यात त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले.

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

त्यांना विलगीकरणात ठेवून उपचार दिले. वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी इंदू, सुनिता व वर्षा मावशी, घोसाळकर आजोबा, राहुल पाठक, प्रमोद गिरी या सर्वांचे यासाठी सहकार्य लाभले. 

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

जेष्ठ नागरिकांसाठी आभाळमाया वृद्घाश्रम हे दुसरे घरच आहे. एखाद्या मोठ्या आजारानंतर काळजी घेण्यासाठी, दिर्घकाळ रुग्णालयात राहणे ज्यांना परवडत नाही किंवा विभक्त कुटुंबामुळे वृद्ध व्यक्तिंना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यास अशा वृद्धांसाठी अपर्णा देशमुख यांनी या वृद्धाश्रमात व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठांना आरोग्य सुविधांबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही याठिकाणी प्रयत्न केले जातात. यापूर्वी कोल्हापुरातील घर गमावलेले एक आजोबा याठिकाणी दाखल झाले आहेत. एकणू २५ बेघर ज्येष्ठांची याठिकाणी काळजी घेतली जात आहे, तर विविध कारणांनी दाखल असलेल्या ६७ जणांवर याठिकाणी उपचार सुरू आहेत.

Edited By - Prashant Patil



from News Story Feeds https://ift.tt/3k9IUgz
via IFTTT

No comments:

Post a Comment