नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात सीमारेषेवरील तणावाच्या परिस्थितीत अरुणाचल प्रदेशाच्या सीमाभागातून पाच तरुण गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. चिनी सैन्याने या युवकांचे अपहरण केल्याचा दावा काँग्रेसच्या आमदाराने केला होता. त्यानंतर आता या तरुणांची चीन सुटका करणार असल्याचे वृत्त आहे. शनिवारी त्यांना भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. चीन पिपल्स लिबरेशन आर्मी शनिवारी या पाच जणांना भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे सूपूर्द करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
'तो तर भाग आमचा' ;अरुणाचल प्रदेशातून 5 भारतीयांचे अपहरण केल्यानंतर चीनची प्रतिक्रिया
यापूर्वी चिनी सैन्याने 4 सप्टेंबर रोजी भारत-चीन सीमारेषेलगत परिसरातून 5 युवकांना ताब्यात घेतल्याच्या कबूल केले होते. त्यानंतर आता अरुणाचल प्रदेशमधील मूळचे रहिवाशी असलेल्या युवकांना भारताच्या स्वीधीन करण्याची तयारी चीनने दर्शवली आहे, अशी माहिती रिजिजू यांनी दिली आहे. शनिवारी कोणत्याही वेळी चीन संबंधित तरुणांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सूपूर्द करेल, असा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.
हाँगकाँग पोलिसांची क्रुरता; 12 वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर केल्याचा...
बेपत्ता तरुणांपैकी एकाच्या भावाने फेसबुकवर पोस्ट केली होती. यात त्याने भारतीय सेनेच्या सेरा- 7 पेट्रोलिंग भागातून चीनच्या सैनिकांनी पाच जणांचे अपहरण केले असल्याचे लिहिले होते. ही जागा दापोर्जिया जिल्हा मुख्यालयापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. फेसबुक पोस्टनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. नाचो गाव सेरा-7 पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरुण वाहकाच्या स्वरुपात भारतीय सैनिकांसोबत जुडले गेले होते. हे तरुण भारतीय जवानांना सामान पुरवण्याचं काम करायचे. ते जंगलच्या दिशेने गेले होते, त्यानंतर चीनच्या जवानांनी त्यांचे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
from News Story Feeds https://ift.tt/35tMOg5
via IFTTT


No comments:
Post a Comment